पत्रकारांच्या प्रतिमेच्या उन्नतीसाठी सकारात्मक उपक्रमांची गरज – एक सजग भूमिका
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(शब्दांकन -संदिप महाजन सर)
पत्रकारांच्या प्रतिमेच्या उन्नतीसाठी सकारात्मक उपक्रमांची गरज – एक सजग भूमिका
सध्या समाजात पत्रकारांच्या प्रतिमेबाबत अनेक गैरसमज व नकारात्मक भावना तयार झाल्या आहेत. काहीजण पत्रकारितेला केवळ व्यक्तिगत फायद्याचे माध्यम मानतात. मात्र, ही भावना पूर्णतः चुकीची आहे. कारण अनेक पत्रकार समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करत असतात. त्यांचे उद्दिष्ट केवळ सत्य समोर आणणे आणि लोकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे असते.
अशा पार्श्वभूमीवर जर कोणी पत्रकार स्वतःचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता चांगला सामाजिक उपक्रम राबवत असेल, तर त्याचे कौतुक व्हायला हवे. संबंधित महसूल विभाग, नगरपालिका किंवा वीज वितरण कंपनी (एमएसईबी) यामध्ये त्या पत्रकारामुळे कोणाचेही काम थांबलेले नाही, हे स्पष्ट आहे. उलटपक्षी, या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात पत्रकारांविषयी सकारात्मक संदेश जाईल.
समाजात पत्रकारांविषयी ज्या गैरसमजुती पसरवल्या जात आहेत, त्या दूर करण्यासाठी अशा विधायक उपक्रमांची गरज आहे. जेव्हा पत्रकार स्वतःहून पुढाकार घेऊन सामाजिक भान जपत काही चांगले करतात, तेव्हा पत्रकारितेची खरी ओळख समोर येते.
या उपक्रमातून कोणताही वैयक्तिक लाभ न घेतलेला असला, तरी पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीची ही जाणीव आहे. त्यामुळे या उपक्रमाकडे केवळ एक साधी कृती म्हणून न पाहता, पत्रकारांच्या प्रतिमेला उन्नत करणारा प्रयत्न म्हणून पाहिले पाहिजे. कारण शेवटी पत्रकारितेचा आत्मा हा समाजहितासाठीच असतो.
Comments
Post a Comment