आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरी(गंगापुर)येथे इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात संपन्न..!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
जीवन मानस.(गंगापुर वार्ताहर)
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरी येथे इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात पार पडला. सर्वप्रथम छान सजविलेल्या ट्रॅक्टर मधून विद्यार्थ्यांची प्रवेशदिंडी काढण्यात आली, वेगवेगळे मुखवटे लावून विद्यार्थी या प्रवेश दिंडीत सहभागी झाले, त्यानंतर विद्यार्थ्यांचे फुलांचे आच्छादन केलेल्या प्रवेश द्वारातून वर्गात प्रवेश झाला, गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. वंदना ताई राऊत यांनी स्वतः विद्यार्थ्यांचे औक्षण केले. शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल कुंकवाच्या ठशाने कागदावर घेण्यात आले. विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले आणि शेवटी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जिलेबीचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमास गावच्या प्रथम नागरिक सौ. वंदना ताई राऊत, त्यांचे पती श्री. अविनाशभाऊ राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नवनाथ मोरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. रामदास मोरे व योगेश मोरे, शाळा व्यवस्थापन सदस्य श्री. आप्पासाहेब मोरे, शिक्षण तज्ञ श्री. राजू भाऊ तिवारी तसेच ज्यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले ते अशोक मोरे यांची उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिवाजी मोरे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी आजचा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात पार पाडला.
Comments
Post a Comment