पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्ज वाटप, सभापती----श्री. गणेश भिमराव पाटील
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:-
पाचोरा- अवकाळी पाऊस व प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतीमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे. यात भर म्हणजे शेतीमालाला योग्य भाव नसेल तर शेतकरी फार मेटाकुटिला येतो. यासाठी पर्यायी उपाय योजना म्हणून पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने कृषि पणन मंडळ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमाल तारण कर्ज योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलेला होता. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु केलेली आहे. शेतमाल तारण कर्ज योजना प्रकर्षाने राबविण्याचा निर्णय घेतला असतांना आज शेतकरी अनिल विश्वासराव पाटील रा. पाचोरा यांना शेतमाल तारण कर्ज योजनेतून २,००,०००/-लाख रु.चा धनादेश बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील, संचालक प्रकाश शिवराम तांबे, विजय कडू पाटील , युसुफ भिकन पटेल, सचिव बी. बी. बोरुडे, उपसचिव प्रतिक रमेश ब्राम्हणे, कर्मचारी वसंत चैत्राम पाटील व कर्मचारी उपस्थित होते. बाजार समितीच्या शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये १८० दिवसांसाठी शेतीमालाच्या एकूण किंमतीवर ७०% कर्ज वार्षिक ६% दराने वखार महामंडळ यांच्या पावतीवर दिले जाते. त्यामुळे आपला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याकरिता तसेच वाढत्या बाजार भावाचा फायदा होण्यासाठी शेतीमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील उपसभापती प्रकाश अमृत पाटील व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment