चाळीसगाव पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी मुलांची सुरक्षा व व्यसनमुक्ती या विषयावर तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय ( गुरुकुल) शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीं बरोबर साधला हितगुज...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
चाळीसगाव प्रतिनिधी: सुनील कोळी
चाळीसगाव विद्यार्थिनींची सुरक्षा या विषयावर सध्या सर्वच पालक चिंतेत असून शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलींची चांगल्या प्रकारे सुरक्षा व्हावी काळजी घेतली जावी हा विषय आता सर्वत्र चर्चेत असतानाच यावर जागृती व्हावी म्हणून चाळीसगाव येथे तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय ( गुरुकुल) मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी बरोबर हितगुज साधण्यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी शिक्षक सामाजिक संघटना यांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन आज संवादाचे आयोजन केले होते यात विद्यार्थिनींनी आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांना ओळखावे आपली सुरक्षा स्वतः कशी करता येईल यासाठी भक्कम व्हावे व गुडटच आणि बॅड टच ओळखून आपल्या पालकांशी या विषयावर मन मोकळेपणे बोलावे. विद्यार्थ्यांना वाहतुक नियमाचे महत्त्व सांगीतले तसेच व्यसनमुक्ती बाबत माहिती देऊन त्याचे होणारे परिणाम याबाबत माहिती देऊन मुलीच्या व मुलांच्या सुरक्षितते बाबत सहायक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ देशमुख व डॉ. मुकुंद करंबेकर यांनी मुलींच्या वाढत्या वयाबरोबर होणारे बदल व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले.
तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय ( गुरुकुल) ट्रस्टी व सचिव डॉ. हरीश दवे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत असताना शाळा प्रशासन व शिक्षक वृंद विद्यार्थिनीं च्या सुरक्षेच्या विषयावर होत असलेल्या उपक्रमात संपूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन दिले यावेळी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या 600 विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देशपांडे सर यांनी केले या उपक्रमातून विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वतःची काळजी घेतील व त्यांच्यामध्ये जागृती होईल ही अपेक्षा करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment