लंडन किड्स प्री-स्कूल पाचोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला..!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी)
लंडन किड्स प्री- स्कूल, पाचोरा येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात शालेय प्रांगणात हा विशेष योग दिवस पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन आदरणीय जितेंद्र दादा जैन यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.या विशेष प्रसंगी  योगाचार्य श्री शिवांगी पाटिल व कु काजल जैन यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने आणि प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक लाभ, मनःशांती, ताणतणावमुक्त जीवनशैली यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. 
या योग दिनाचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणीसाठी शाळेतील क्रीडा शिक्षकांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहाने योगाभ्यास केला.या उपक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी आत्मीयता, आरोग्याबद्दल जागरूकता व भारतीय परंपरेचा अभिमान निर्माण झाला असून योगदिनाच्या निमित्ताने शाळेतील संपूर्ण विद्यार्थी हजर होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद