पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे आज "आंतरराष्ट्रीय योग दिन" व "एक पेड मा के नाम"हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी 
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर,पाचोरा येथे आज "आंतरराष्ट्रीय योग दिन" व "एक पेड मा के नाम" हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला मुख्य इमारतीत सकाळ सत्रात श्री.संदीप वाघ सर,श्री.आशिष पाटील सर, दुपार सत्रात श्रीमती.रूपाली पाटील मॅडम तर भडगाव रोड विभागात श्रीमती.सारिका पाटील मॅडम व श्री. योगेश सोनवणे सर यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना प्राणायाम,सूर्यनमस्कार व विविध शारीरिक हालचाली यांची प्रात्यक्षिके करून योग बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले.तसेच "एक पेड मा के नाम" या उपक्रमांतर्गत शालेय परिसरात विद्यार्थी-पालक- शिक्षक यांच्यासोबत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद