तळागाळातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे व सामाजिक बांधिलकी जपणारे धाडसी पत्रकार म्हणजे अनिल आबा येवले: - गणेश शिंदेपत्रकार अनिल येवले हे नेहमीच सर्वांन विषयी लिहतात. पण त्याच्या विषयी कोण लिहणार.? अनिल आबा येवले जीवनातील थोडक्यात....!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(शब्दांकन : गणेश शिंदे,साईमत समाचार ह.मु.पुणे)
पाचोरा शहरातील मी व माझे वडील.जेष्ठ पत्रकार कै "जनार्दन शिंदे"आम्ही पिता पुत्र पत्रकारितेत समाजसेवेसह वृतपत्र व्यवसायात सक्रिय झालो, तेव्हापासून तर आजपर्यंत आमच्या आयुष्यात "अनिल आबा येवले"ची महत्वाची अग्रभागी भूमिका आहे. अनिल येवले म्हणजे हे एक विचारांची स्वतःचं वृत्तपत्र आहे. तळागाळातील सर्वसामान्याना जिव्हाळा वाटणारे व सर्वच क्षेत्रातील बातम्या फास्ट सर्व वाचकांपर्यंत पोहोचविणारे जळगाव जिल्ह्यातील एकमेव "अनिल येवले पत्रकार" म्हणून  नावलौकीक आहे. अनिल येवले याच्या योग्य मार्गदर्शनामुळे अनेक पत्रकार संघटना व त्यातील पत्रकार हे मोठे झाले. सर्वांत महत्वाची नमुद करणारी बाब म्हणजे अनिल येवले हेच एक वृत्तपत्र असून शुन्यातून विश्वनिर्मिती करीत सत्यबाजू निर्भिड व ठामपणे मांडणारे हे होय. अनिल येवले हे खरोखरचं  चांगले मित्र आहेत. कोणीही पदावर असोत अथवा नसोत तरीही त्यांच्या वागण्यात अथवा आमच्या काही बातम्या असतील, त्या अनिल आबा येवले यांनी सोशल मीडियात प्रकाशित करण्यात कधीही त्यांनी फरक केला नाही.  नेहमीच बातम्यांच्या माध्यमातून चांगले दखल घेतली आहे. आजही बातम्याच्या बाबतीत सर्वांत लवकर बातमी प्रकाशित करणारे *अनिल आबा येवले* नावलौकिक अग्रभागी आहेत.  यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत असते. त्यांच्या बद्दल बोलायचे झाले तर ते माणुसकीचा झरा असून  पोलीस टाइम्स वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व सामान्यांसाठी हक्काचे व्यासपिठ त्यांनी उभे केले आहे. सातत्याने आजच्या आधुनिक जगात सोशल मीडिया चालविणे जिकरीचे असतांनाही "अनिल आबा येवले"ठामपणे उभे असून दिवसेंदिवस येवले आबा अधिकाधिक प्रगती व भरभराटी होवो "अनिल आबा येवले" नुसतं पत्रकार नसून ते राजकीय समाजसेवक लेखक व्यवसायिक मार्गदर्शक डांसर आहेत. बिना पक्षाचा बिना पैशाचा निवडणूक लढवून प्रचंड मतदान मिळेवणारा जळगाव जिल्ह्यातील हा पहिला व्यक्ती आहेत. निवडणूक कोणतीही असो. सहकार क्षेत्रात असो की स्वराज सस्था असो. 




कोणताही विचार न करता व लाचार नव्हता सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरर्जासाठी लढणारा व्यक्ती "अनिल आबा येवले" यांच्याकडे पाहिले जातात अनिल आबा येवले यांनी राजकीय व अधिकारी प्रशासनात आपले वचक कायम ठेवले आहे. सत्ता असो वा नसो पद असो वा नसो तरीही अनिल आबा येवले यांनी शब्द टाकला म्हणजे प्रश्न मिटलाच पाहिजे अशी त्यांची ख्याती आहे. आज भरकटलेल्या  तरुणांना आणि नवनवीन पत्रकारांना योग्य दिशा व मार्ग दाखवण्यासाठी अनिल येवले अशा, ज्येष्ठ पत्रकारांची फार गरज आहे.अनिल आबा येवले यांच्या विषयी लिहिणे आणि बोलणे झाले, म्हणजे समुद्राचे पाणी कमी पडेल पण त्यांचे कौतुकाचे शब्द अपूर्ण पडणार नाही. इतकं खूप सार आहे. तरी आज अनिल आबा येवले यांच्या वाढदिवसा निमित्ताने मांडलेले थोडक्यात दोन शब्द त्यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा 
शब्दांकन: गणेश शिंदे
(साईमत समाचार, संपादक)

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद