पुजा बागुल हत्या प्रकरण... उद्या दिनांक ६जुन रोजी भडगाव येथे निघणार आक्रोश मोर्चा आपल्या सासरवाशिण बहीणीला न्याय देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने हजर रहावे
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव प्रतिनिधी
*भडगाव येथील माहेरवाशीण कै. शारदा उर्फ (पूजा) बागुल (माळी) दि. २९ मे रोजी तिचा पती, नणंद, सासू, सासरे आणि इतर संशयित यांनी माणुसकीलाही काळिमा फासेल अशा पद्धतीने अनन्वित अत्याचार करून तिला धुळे येथे अमानुष मारहाण करून खून केला. याकृत्या विरोधात समस्त भडगावकारांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे.*
*तरी सर्व समस्त भडगावकारांनी आपल्या कन्येला, बहिणीला त्वरित न्याय मिळावा व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आक्रोश मोर्चात कुटुंबासह सहभागी व्हावे ही विनंती*
*तारीखः- ६ जून २०२५ वार- शुक्रवार*
*वेळः- सकाळी ९ वाजता*
*मोर्चाची सुरुवात ठिकाणः भडगाव नगरपरिषद जवळ बाजार चौक भडगाव. ते तहसील कार्यालय*
Comments
Post a Comment