पाचोरा पीपल बँक च्या संचालक पदी श्री विकास वाघ यांची बिनविरोध निवड...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा येथील नुकत्याच पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुका जाहीर असून अनेक प्रतिष्ठित  व्यापारी, माजी संचालक तसेच मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून त्यापैकी किती माघार घेतात याकडे लक्ष लागून आहे. निवडणूक बिनविरोधही होवू शकते. शेवटी फॉर्म भरलेले सदस्य किती माघार घेतात व किती लढवू शकतात हे चित्र माघारी नंतर समजेल. पण एक जागा बिनविरोध झालेली असून श्री .विकास वाघ हे एकमेव असे आहेत  त्यांच्या विरोधात कोणीही फॉर्म भरला नाही. त्यामुळे ते बिनविरोध झालेले आहेत.  गेल्या दहा वर्षापासून पीपल्स बँकेत ते संचालक असून त्यांचा वाघ डेअरी फर्म हा पाचोरा व जळगाव येथे व्यवसाय असून त्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.  त्यांची कुठलीही राजकीय वाटचाल नसून सर्व वाघ बंधू समाजोपयोगी उपक्रमांसाठी नेहमी अग्रेसर असतात. त्यांचे एक लहान बंधू माजी नगरसेवक असून त्यांचे विविध व्यवसाय आहे पाचोरा शहरात त्यांचे एक चांगली प्रतिमा असून यापूर्वी त्यांनी केंद्रीय उर्जा मंत्रालय सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य, क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य यासारखी महत्वाची पदे भूषवली असून सद्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना यांच्याशी संलग्न अधिकृत जिल्हा संघटनेचे सचिव आहेत.  संपूर्ण तालुक्याला त्यांणा परिचय असून  विकास वाघ यांचा गोड स्वभाव व डॅशिंग, रुबाबदार तडफदार व्यक्तिमत्वामुळे  ते नेहमी चर्चेत येत असतात.त्यांचे सर्व पक्षीय संबंध असल्यामुळे त्यांची ही बिनविरोध निवड झालेली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन होत आहे🌹

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद