डॉ. किरण वाणी यास खगोल भौतिकविज्ञान विषयात पीएचडी....पाचोरा येथील रहिवासी किरण वाणी यास खगोल भौतिक विज्ञान विषयात पीएचडी पदवी प्राप्त झाली...!
डॉ. किरण वाणी यास खगोल भौतिकविज्ञान विषयात पीएचडी*
पाचोरा येथील रहिवासी किरण वाणी यास खगोल भौतिक विज्ञान विषयात पीएचडी पदवी प्राप्त झाली.
डॉ. किरण हा आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्सर्वेशनल सायन्सेस (ARIES), नैनीताल या राष्ट्रीय संस्थेत 2020-2025 या कालावधीत संशोधक म्हणून अस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स (Astronomy and Astrophysics) मध्ये संशोधन करत होता. तिथे डॉ. हरित्मा गौर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली "Active Galaxies" या ग्रहताऱ्यांशी संबंधित खगोल भौतिक विज्ञान विषयावर संशोधन करत होता.
नांदेड विद्यापीठात प्रा. डॉ. एम .के .पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "Studies of Flux and Spectral Variability of Blazars" या विषयात PhD केली. सध्या किरण वाणी हा बंगळुरु येथे "पोस्ट-डॉक्टरल संशोधक" म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स या राष्ट्रीय संस्थेत पुढचे संशोधन करत आहे.
डॉ किरण वाणी हा पाचोरा येथील अरुण वाणी यांचा मुलगा आहे. किरण याने इंजिनिअरिंग किंवा मेडिकल शाखेत करिअर न करता संशोधनात करिअर करणे हे त्याचे लहानपणापासून स्वप्न होते. डॉ. किरण वाणी यांनी देशातील नामांकित राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये संशोधक म्हणून कार्य करायचं ठरवलं आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment