पाचोरा येथे आज बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबिर उत्साहात संपन्न....!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी –
शहरातील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे दिनांक १७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता एक सामाजिक व कल्याणकारी उपक्रम राबवण्यात आला. इमारत बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या मजुरांसाठी गृह उपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या प्रयत्नातून करण्यात आले होते. कार्यक्रमास मा. नगरसेवक महेश प्रकाश सोमवंशी, युवानेता सुमित दादा किशोर पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, प्रविण ब्राह्मणे, योगेश पाथरवाट, दिलीप परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी १५० बांधकाम मजुरांना गृह उपयोगी किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन व शिबिर व्यवस्थापन हर्षल सुनील, दामोदर कुणाल, मंगल धनगर, मनीष प्रभूलाल भोई, राज सोमवंशी, सागर बंडू सोनार यांनी नेटाने पार पाडले.
सदर उपक्रमामुळे कामगार बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेऊन गरजूंना मदतीचा हात देण्याचा हा प्रयत्न सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरला.
स्थळ – शिवतीर्थ जय किसान कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा | दिनांक – १७ जून २०२५ | वेळ – सकाळी १० वा.
Comments
Post a Comment