जितो लेडीज विंग, दोंडाईचा तर्फे आयोजित “स्वयं – नाती घट्ट, व्यवसाय जलद” हा कार्यक्रम संपन्न..!

मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा प्रतिनिधी:
दोंडाईचा:-जितो लेडीज विंग, दोंडाईचा तर्फे आयोजित “स्वयं – नाती घट्ट, व्यवसाय जलद” हा कार्यक्रम 21 जून रोजी उत्साहात पार पडला. सुमारे ७० महिलांनी सहभाग घेऊन आपापला व्यवसाय, कौशल्य व अनुभव मांडत एकमेकांशी जुळवून घेतलं.
प्रत्येक महिलेनं स्वतःचं व्यवसायिक परिचय दिला
"जितो नारीसनशाइन" डीरेक्टरीचे प्रकाशन – सहभागी महिलांची माहिती, व्यवसाय, संपर्क यांचा समावेश असलेली डायरेक्टरी. यामुळे महिलांमधील रेफरल नेटवर्किंग व व्यवसायवाढ अधिक सुलभ होणार आहे.या  कार्यक्रमात 
विशेष मार्गदर्शक म्हणुन 
मनीषा ताथेड़,ऑनलाइन मार्गदर्शन हेमंत मोदी व सुदर्शन छल्लानी यांनी केले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती
 हस्ती बँकेचे चेअरमन कैलाश जैन, सकल संघाचे अध्यक्ष मनोज मालू यांची लाभली.कार्यक्रमासाठी सुनिल गरगे  व त्यांच्या संपूर्ण टीमचे 
सहकार्य लाभले. 
दोंडाईचा मधील सर्वात मोठ्या महिला नेटवर्किंग कार्यक्रमांपैकी एक प्रत्येक सहभागी महिलेनं स्वतःचा व व्यवसायाचा परिचय दिलाअनेक महिलांसाठी हा मंच होता त्यांचा पहिला व्यावसायिक अनुभव त्यांनी सांगितला.
जितो नारीसनशाइन’ डिरेक्टरी प्रकाशन करण्यात आली .यामुळे महिला उद्योजिकांमध्ये रेफरल, नेटवर्किंग व व्यवसायाची ओळख अधिक बळकट होणार आहे."स्वयं" हा कार्यक्रम केवळ एक दिवसीय आयोजन न राहता, तो महिला सशक्तीकरणाचा एक दिशादर्शक टप्पा ठरला.
 सर्व जैन महिलांसाठी खास आवाहन करण्यात आले की 
"स्वयं मीट" सुरू होत आहे –"जितो नारी सनशाईन" या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला एक खास मीटिंग घेण्यात येईल, ज्यात मार्गदर्शनपर सत्र, स्वविकासाचे धडे, आणि सकारात्मक ऊर्जा देणारे कार्यक्रम असतील.
जर आपण या सत्रांमध्ये सहभागी होण्याची इच्छुक असाल तर, कृपया आपले नाव नोंदवा.ही संधी आहे स्वतःमध्ये नवीन बदल घडवण्याची.
चेयरपर्सन सुगंधा जैन आणि संपूर्ण टीमच्या प्रयत्नांमुळे या उपक्रमाने एक नव्या यशाचा प्रारंभ केला . अध्यक्ष सुगंधा जैन, उपाध्यक्ष नम्रता कवाड आणि पूनम बाफना, सचिव हर्षा कांकरिया, संयुक्त सचिव डॉ. कल्याणी मुनोत आणि ममता गुलेच्छा , खजिनदार सपना चतुरमुथा, यांनी परिश्रम घेतले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: ममता गुलेच्छा आणि आभार प्रदर्शन चंदनबाला भंडारी यांनी केले *✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद