पाचोरा नगरपरिषद तर्फे चिकन मटण,मांस वेस्टेज कलेक्शन साठीे घंटागाडी आज पासून शुभारंभ...!




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
पाचोरा शहरात काही दिवसांपासून चिकन, मटन मांस विक्रेतांचे उरलेल्या वेस्टज मांस चे तुकडे हे काही हायवे भागात, रेल्वे उड्डाणपूल जवळपास पडलेल्या स्थितीत असायचे तेव्हा त्या भागात दुर्गंधी पसरली जात होती.तसेच ये-जा करणारे पादचारी, विद्यार्थी यांना दुर्गंधी चा सामना करावा लागत होता तसेच मांस खाणारे कुत्रे पण चावा घेत होते ही समस्या खुपच जटील झाली होती.एक ते दोन वर्षाआधी नव्याने कारभार सांभाळलेले कार्यतत्पर पाचोरा नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांना पाचोर्यातील पत्रकारांनी ही समस्या सांगताच त्यांनी लागलीच यावर उपाययोजना करुन अमंलबजावणी करत पत्रे लावुन कायमचा बंदोबस्त केला, नंतर नवगजा पुल हायवे लगत भागात व इतर चिकन मटन मांस फेकणे सुरू झाले मागील आठवड्यात जनलक्ष्य न्युज चे संपादक प्रमोद बारी यांनी देखील नवगजा पुल हायवे मांस मुळे कुत्र्यांपासुन व दुर्गंधी पासुन बचावासाठी बातमी लावली होती तीची दखल घेत  व पाचोरा शहरातील  आरोग्या च्या दृष्टीने  पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक व आरोग्य अधिकारी यांनी नवीन वाहनांचा आजपासून शुभारंभ करून  आरोग्यात व  सुरक्षितेत भर पडेल  मुख्याधिकारी अधिकारी कर्मचारी यांचे मनापासून आभार,शहर स्वच्छ होण्यास मदत होईल..!

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद