पाचोरा येथील कै.पि.के.शिंदे शाळेचे शिक्षक मा.डी.आर.कोतकर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी:
कै.पी.के.शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा येथील डी.आर कोतकर सर हे नियत वयोमानाप्रमाणे 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले.त्यांचा सेवापुर्ती सोहळा 22 जून 2025 रविवार रोजी आशीर्वाद हॉल या ठिकाणी नाशिक विभागीय शिक्षक  आमदार मा.श्री.सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
श्री.डी.आर.कोतकर सर यांना गिरणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन   मा. बापूसाहेब सतीश शिंदे (चेअरमन-गिरणाई नागरी सहकारी पतसंस्था) यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा.दादासाहेब श्री.राजेंद्र पाचपुते (प्रदेशअध्यक्ष महाराष्ट्र वाणी युवा मंच, अध्यक्ष स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्था, धुळे), मा.श्री.अमोल भाऊ शिंदे (युवा नेते भा.ज.पा.), मा.श्री.राजेंद्र चिंचोले (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक) हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.श्री.जे.डी.काटकर साहेब(सचिव,गिरणाई शिक्षणा संस्था), मा.श्री.निरज पी.मुणोत (उपाध्यक्ष गिरणाई शिक्षणा संस्था), मा.प्रा.डॉ.शिवाजी शिंदे (सहसचिव, गिरणाई शिक्षण संस्था),मा.श्री. अण्णासाहेब समाधान पाटील (गटशिक्षणाधिकारी पं.स.पाचोरा),मा.श्री.अभिजीत खैरनार (केंद्रप्रमुख भातखंडे) हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वसुंधरा लांडगे मॅम अमळनेर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.नीरज पी मुणोत यांनी केले. श्री.डी.आर.कोतकर सरांचा परिचय श्री.हेमंत टोणपे सर यांनी करून दिला. शाळेतील विद्यार्थिनी कु.स्वराली नितीन येवले(इ.९वी) हिने कोतकर सरां विषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. कुटुंबातील व्यक्ती म्हणजे सरांचा मुलगा यश ज्ञानेश्वर कोतकर याने आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या तेव्हा उपस्थित श्रोत्यांचे डोळे पाणावलेत. माझे वडील म्हणजे माझे गुरु,मार्गदर्शक आणि मित्र सुद्धा आहेत असेही शेवटी तो आपल्या आपल्या भाषणातून म्हणाला.शाळेतील शिक्षिका श्रीमती एस.एस.ताड मॅम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सरांची काम करण्याची पद्धत अतिशय नम्रपणे समजावून सांगून काम करून घेण्याची होती. सरांकडून बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्यात, त्यामुळे सर तुम्ही आमच्या आठवणीतील शिक्षक असणार असेही शेवटी ते आपल्या भाषणातून म्हणाल्या. श्री.जे.बी.पाटील सर (प्राचार्य शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,दिपनगर) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोतकर सरांसोबत च्या आठवणी व्यक्त केल्यात.मा.श्री. अण्णासाहेब समाधान पाटील, मा.प्रा.डॉ.शिवाजी शिंदे, मा.श्री.राजेंद्र चिंचोले, मा.डॉ.जयंत पाटील, मा.श्री.राजेंद्र पाचपुते, मा.श्री.अमोल भाऊ शिंदे, इत्यादी जणांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सरांसोबतचा अनुभव, गणिताबद्दलच्या त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती विषयी व समाजात वावरताना त्यांच्या सामाजिक कार्याविषयी असलेले प्रेम आणि आवड आणि सामाजिक कार्याची तळमळ व कळकळ याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.आमदार मा.श्री.सत्यजित तांबे यांनी कोतकर सरांना सन्मानपत्र,शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले.शेवटी अध्यक्षीय भाषणात मा.श्री.सत्यजित तांबे यांनी कोतकर सरांच्या सामाजिक कार्याचा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.स्व.डॉ.नरेंद्र दाभोळकर आणि आमदार सत्यजित तांबे यांचे वडील माजी आमदार डॉ.सुधीर तांबे हे चांगले मित्र होते. कोतकर सर तुम्ही आणि मी आपण पुरोगामी विचाराचे आहोत असेही शेवटी ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. सत्काराला उत्तर देताना श्री.डी.आर.कोतकर सरांनी शाळेत राबविलेले उपक्रम आणि त्यामध्ये असलेला सक्रिय सहभाग याविषयी प्रत्येक उपक्रम राबवताना मला मुख्याध्यापक,संस्थाचालक व सहकारी शिक्षक या सर्वांचे सहकार्य मिळत होते. म्हणूनच मी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडू शकलो असेही शेवटी ते म्हणाले. मुख्याध्यापक, शाळेतील स्टॉप संस्थाचालक याविषयी ऋण व्यक्त केले. सौ वसुंधरा लांडगे मॅम यांनी त्यांच्या मधुर आवाजात म्हटलेल्या पसायदान नंतर आभार प्रदर्शनाचे  काम श्री.आर.बी.धोबी सर यांनी केले.  कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजन घेतले. सदर कार्यक्रमासाठी कै.पि.के.
शिंदे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, महाराष्ट्र वाणी युवा मंचचे सर्व सन्माननीय सदस्य, नमस्ते ग्रुपचा सर्व मित्र परिवार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे कार्यकर्ते.इ. जणांनी अथक परिश्रम केले. सदर कार्यक्रमास खलील दादा देशमुख(सामाजिक कार्यकर्ते), शरद पाटे(माजी उपनगराध्यक्ष), रमेश वाणी (जिल्हाध्यक्ष, व्यापारी आघाडी भा.ज.पा), भावेश अहिरराव(मानद सचिव माध्यमिक शिक्षक पतसंस्था जळगाव), प्रमोद दादा जडे(संघटक ,नमस्ते ग्रुप ), एजाज शेख (वक्ता जीवन संजीवनी), श्री.सु.ना.पाटील (मुख्याध्यापक, शिंदे प्राथमिक शाळा), श्री.महेश देशमुख सर, डॉ.वीरेंद्र पाटील,डॉ.अजय परदेशी, डॉ.प्रशांत सांगडे,डॉ.मुकेश तेली, श्री.शरद केशव पाटील (सेल टॅक्स ऑफिसर), प्रा.सी.एन.चौधरी,‌ श्री.अनिल भाऊ येवले, श्री.शामकांत सराफ, श्री.राजेंद्र खैरनार इ.पत्रकार मंडळी, समाजातील प्रतिष्ठित व्यापारी वर्ग, तसेच समाज आणि समाजेतर बंधू आणि भगिनी असे जवळपास 500 पेक्षा जास्त जण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद