दि 26/06/2025 रोजी सकाळी ठिक 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर पाचोरा शहरात (व्यापारी भवन, कृषि उत्पन्न बाजार समिती समोर) येथे आयोजित केला असून सदरील शिबिरात खालील विभागातील लाभार्थीना लाभ दिला जाईल...!
संजय गांधी योजना शाखा
1)संगायो/इंगायो/श्रावणबाळ योजनेत पात्र लाभार्थी यांना अर्ज सादर करता येतील.
2)सदरील ठिकाणी योजनेची परिपूर्ण माहिती आपणास मिळेल.
3)पात्र लाभार्थी यांना लाभ देणेबाबत प्रमाणपत्र देण्यात येईल
पुरवठा विभाग
1)आपणास या ठिकाणी नाव कमी/जास्त करणे याबाबत अर्ज दाखल करता येईल.
2)नवीन शिधापत्रिका मिळणेकामी अर्ज दाखल करता येईल.
3)शिधापत्रिका/रेशन बाबत योग्य ती माहिती मिळेल.
4) अन्नधान्य सुरु करण्या बाबत अर्ज करता येईल... माहिती मिळेल
PM किसान सन्मान निधी योजना
1)आपणास पात्र लाभार्थी यांना अर्ज सादर करता येईल.
2)यापूर्वी भरण्यात आलेल्या अर्जावर काही त्रुटी असेल तर त्याचे निरसन केले जाईल.
3)सदरील योजनेची माहिती मिळेल.
कृषि विभाग
1)कृषि विभागच्या विविध योजनेचे अर्ज भरून घेतले जातील.
2)शेती आवजारे,पाईप,ठिबक सिंचन इत्यादी बाबत चे अर्ज व त्याबाबतची माहिती आपणास मिळेल.
विद्युत वितरण विभाग (MSEB)
1)आपणास नवीन मीटर जोडणी, नवीन विद्युत जोडणी बाबतचे अर्ज सादर करता येतील.
2)आपले थकीत बिल किंवा अन्य शंकेचे निरसन केले जाईल.
3)विविध योजनेची माहिती मिळेल. (Kusum सोलर, सूर्यघर सोलर योजना )
पंचायत समिती विभाग
1)अनुदान विहीर मागणी/शेड मागणी बाबतची माहिती मिळेल.तसेच पात्र अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जातील.
2)पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनेची माहिती मिळेल व त्या बाबतचे अर्ज स्वीकारले जातील.
3) गोटा शेड बाबत माहिती मिळेल
4) egs अंतर्गत रोजगार निर्मिती
वन विभाग/सामाजिक वनीकरण
1) वन विभातील सर्व योजनेची माहिती मिळेल.त्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील.
2)वृक्ष लागवड बाबत माहिती दिली जाईल.
3) मोफत रोपवितरण
भूमी अभिलेख विभाग
1)आपल्या शेताची मोजणी बाबत अर्ज सादर करता येईल.
2)पो. ख क्षेत्र वहिती प्रलंबित प्रकरणात तात्काळ निपटारा करता येईल.
3)भूमी अभिलेख अंतर्गत दाखल अर्जाची चालू परिस्थिती बाबत विचारणा करता येईल.
आपले सरकार सेवा केंद्र/CSC केंद्र
1)आपणास या ठिकाणी उत्पन्न दाखले, रहिवाशी प्रमाण पत्र, नॉन क्रिमि्लेयर, जातीचे दाखले इत्यादी अर्ज स्विकारले जातील.
2)या साठी लागणाऱ्या कागदापत्रांची माहिती आपणास मिळेल.
राष्ट्रीयकृत बँक
1) नवीन खाते उघडता येईल.
2)बँकेतुन मिळणारे कर्जा बाबत मार्गदर्शन मिळेल.
महसूल विभाग
1)आपल्या गावातील तलाठी (ग्राम महसूल अधिकारी )यांचेकडून 7/12,उत्पन्न दाखला मिळेल.
2)महसूल अंतर्गत येणारे विविध योजनाची माहिती मिळेल.
RTO विभाग
1)आपणास या ठिकाणी ड्रायविंग परवाना मिळू शकतो.
2)वाहनांची नोंदणी करता येते.
3) नवीन नंबर प्लेट बाबत माहिती
परिवहन महामंडळ
1)विद्यार्थी चे पासेस मिळू शकतात.
2)शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळू शकते.
3) ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या योजना बाबत माहिती
पोलीस/वाहतूक शाखा
1)विविध कायद्याची माहिती मिळू शकते.
2)रस्ते वाहतुकीचे नियम आणि सुरक्षा बाबत माहिती होऊ शकतात.
वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय
1)आरोग्याची काळजी घेणे कामी ची माहिती
2)विविध मोफत शस्त्रक्रिया कामी लागणारे कागदपत्रे कोणती याबाबत माहिती मिळू शकते.
3) BP, शुगर तपासणी,
महिला व बाल विकास विभाग
1)लाडकी बहीण मानधन बाबत माहिती मिळेल.
2)शासनाच्या महिला साठी असणाऱ्या विविध योजनेची माहिती आपणास मिळेल.
शिक्षण विभाग/गटशिक्षणाधिकारी
1)मुलांना शैक्षणिक सुविधा चा लाभ या ठिकाणी मिळेल.
पशु वैधकीय विभाग
1)शेतकरी बांधवाना पशु पालन बाबतच्या योजनाची माहिती/सबसिडी बाबत माहिती मिळू शकते.
2) लसीकरण बाबत माहिती
बी.एस.एन.एल विभाग
1)आपल्या मोबाईल किंवा लँडलाईन बाबतचे जोडणी बाबत माहिती.
2)wifi/data connection बाबतचे प्लॅन माहिती करून घेता येतील.
नगरपालिका
1)प्रधानमंत्री घरकुल योजना
2)रमाई घरकुल योजना
3)महिला बचत गट नोंदणी
4)जन्म मृत्यू नोंदणी
5)मालमत्ता उतारा
6)तक्रार निवारण
7)नवीन नळ जोडणी
8)बांधकाम परवानगी इत्यादी चा लाभ घेता येईल.
सहकार विभाग
1) सोसायटी कर्ज बाबत माहिती
सदरील उपरोक्त सर्व विभाग व अन्य विभाग हे एकाच छताखाली आपणास सेवा देण्यासाठी दि.26/06/2025 रोजी सकाळी ठिक-10:00 वाजता पाचोरा शहरात व्यापारी भवन, कृषि उत्पन्न बाजार समिती समोर येथे उपास्थित राहणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी ह्याचा लाभ घ्यावा.
आम्ही येत आहोत,आपण पण या
Comments
Post a Comment