पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक , दिनांक 23-06-25 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीत सहभागी होत शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा "पुणे - नाशिक" सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्प व इतरही काही महत्त्वाच्या विषयांबाबत मुद्दे मांडले.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी:-
पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक , दिनांक 23-06-25 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीत सहभागी होत शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा "पुणे - नाशिक" सेमीहायस्पीड रेल्वे प्रकल्प व इतरही काही महत्त्वाच्या विषयांबाबत मुद्दे मांडले.
📌 भारतातल्या GMRT प्रमाणेच जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका अशा देशांमध्येही भव्य टेलिस्कोप अस्तित्वात आहेत. योग्य नियोजन व योग्य अंमलबजावणी या आधारावर त्या देशांनी टेलिस्कोपच्या परिसरातून रेल्वे प्रकल्प यशस्वीरित्या सुरू केले आहेत. म्हणूनच, GMRT प्रकल्प हे रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचे कारण असू नये, पूर्वी ठरलेल्या मार्गानेच पुणे - नाशिक रेल्वे प्रकल्प करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
📌 श्रीरामपूर रेल्वे विभाग अतिक्रमण संदर्भात
📌बेलापूर तालुका श्रीरामपूर रेल्वे स्थानकावरील नवीन मालधक्का उभारणे संदर्भात
📌लाडगाव पडेगाव तालुका श्रीरामपूर येथे रेल्वे लाईन हद्दीत अंडरपास बांधणे बाबत
📌मध्य रेल्वे दौंड मनमाड मार्गावरील गाड्या बेलापूर स्थानकावर थांबल्या पाहिजे.
📌आंचलगाव, खिर्डी गणेश ,बोलकी येथील शेतकऱ्यांना रेल्वे विभागाच्या हद्दीतून शेतीसाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे .
📌कोरोना कालावधीमध्ये बंद करण्यात आलेल्या सुविधा तसेच गाड्या या पुर्ववत सुरू करण्यात याव्यात.
📌मनमाड पुणे रेल्वे सेवा सुरू करणे.
📌साईनगर - अमळनेर रेल्वे .
📌साईनगर- पंढरपूर रेल्वे.
📌साईनगर ते शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्ग.
📌बेलापूर ते परळी रेल्वे मार्ग .
📌शिर्डी ते शहापूर रेल्वे
📌नागरसोल ते शिर्डी रेल्वे
📌साईनगर - पुणे - ते दादर एक्सप्रेस दररोज सुरू करण्याबाबत.
यांसह रेल्वे प्रशासनाशी संबंधित इतरही लोकहिताचे मुद्दे या बैठकीत मांडले.
यावेळी खा.सौ. सुप्रियाताई सुळे, खा. श्रीमती रजनीताई पाटील, राज्यसभा खासदार श्री नितीन पाटील, खा. विशाल पाटील,खा.श्री. निलेश लंके, खा.श्री. धैर्यशील मोहिते पाटील, खा.श्री. श्रीरंग बारणे, खा.श्री. ओमराजे निंबाळकर, खा.श्री. अमोल कोल्हे,खा.श्री. शिवाजीराव काळगे यांच्यासह मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री. धरमवीर मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. राजेश कुमार वर्मा यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पांमुळे माझ्या मतदारसंघात प्रवास, व्यवसाय, रोजगार आणि शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील, आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. म्हणूनच हे माझे ड्रीम प्रोजेक्ट असून, यासाठी मी सातत्याने संसद व मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करत आहे.
रेल्वे प्रशासनाने अनेक मुद्द्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मी अपेक्षा करतो की ही सर्व कामे तातडीने मार्गी लागतील. जनतेच्या प्रश्नांवर मी नेहमीच ठाम राहिलो आहे आणि पुढेही राहणार आहे.
*आपला माणूस आपल्यासाठी......*
*शिर्डी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी......!!*
Comments
Post a Comment