निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर असे फलक लेखन साकारले त्यावरून योग करण्याचे केले कलाशिक्षकांनी आव्हान....!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनीधी) 
निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी फलकावर  एक सुंदर असे फलक लेखन साकारले आहे. या फलक लेखनातून प्रत्येकाने योग करावा त्याने आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ होते, असा सुंदर संदेश या फलकाच्या माध्यमातुन देण्यात आला आहे. शाळेचे  कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी   यांनी या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे . शाळेच्या  फलकाचा वापर हा केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडेच न देता त्यांतून विद्यार्थ्यांत सामाजिक सलोखा वाढावा तसेच सामाजिक जनजागृती व्हावी म्हणून प्रत्येक सण , तसेच विविध उत्सव अथवा सामाजिक विषय घेऊन फलक लेखन करत असतात. सध्या निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील  कला शिक्षक शैलेश कुलकर्णी पाचोरा ह्यांचे सामाजिक  फलक लेखन समाजात तसेच पाचोरा शहरात चर्चेचा विषय बनत आहेत.

कला शिक्षक शैलेश कुलकर्णी पाचोरा
8446932849

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद