प्रवेश उत्सव2025 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-सुराय

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
सुराय प्रतिनिधी 
*नमन त्या माझ्या पहिल्या मातेस ज्यांनी मला शिक्षण संस्कार दिले* 
*नमन माझ्या दुसऱ्या मातेस ज्यांनी मला घडविले जिल्हा परिषद प्रा.शाळा सुराय🙏*
*""मुलांचे पहिले पाऊल*
*पडू लागले शाळेकडे*
*चला वाजत गाजत नेऊ त्यांना*
*ज्ञानाच्या मंदिराकडे*...
आज आपली ही चिमुकली मुळे आपल्या शैक्षणिक आयुष्याचे सुरुवात करत आहेत.
*.   मुलांना शाळेत पाठवूया,*
    *शिक्षणाचा प्रकाश देऊया!*
            आले आले बघा.
     आमचे उद्याचे आधारस्तंभ.
             पुष्पवृष्टी करुनी
        बळकट करूया त्यांच्या 
              मनोबलाचे पंख.
आज आपल्या सुराय गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सव सोहळा 2025 अतिशय सुंदर पार पडला त्यात चिमुकले उद्याचे भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटबुक गणवेश शूज पेन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले मुलांच्या मनावर व चेहऱ्यावर जो भाव दिसत होता तो अतिशय देखणा आनंदी होता आमची पण सुरुवात या शाळेतून याच आणि याच ठिकाणाहून झालेली आहे मी अभिमानाने सांगू इच्छितो प्रवेशोत्सव सोहळा 2025 या कार्यक्रमाचे नियोजन आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मनापासून हा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लहान मोठे बांधव व महिला माता पालक वर्ग लहान लहान चिमुकले कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच 
*श्री महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती सुराय* यांनी आपल्या गावाच्या जिल्हा परिषद *शाळेला 2100 रुपयाची रोख* देणगी देऊन प्रत्येकी विद्यार्थ्यांना *पेन* वाटप करण्यात आले
*कार्यक्रमाचे अध्यक्ष* 
*सौ वनिताबाई संदीप जाधव*
 *शि.समिती अध्यक्ष*
*प्रमुख पाहुणे* 
*ग.भा.उज्जैनबाई पांडुरंग जाधव सरपंच सुराय*
*श्री गुलाब बाबूलाल पाटील*
*उप सरपंच सुराय* 
*श्री योगेंद्र पांडुरंग जाधव* 
 *पोलीस पाटील* 
*ह भ प परमेश्वर जी महाराज नानाजी*
*श्री एकनाथ गंगाराम पाटील.PSI न्हानजी*
*श्री मोहन दादा जाधव सा.का कर्ता*
*श्री रणवीर दादा पाटील.माझी सैनिक*
*श्री राकेश गिरासे MECB कर्मचारी*
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा स्टॉप व माध्यमिक विद्यालय सुराय शाळेचा स्टॉप व महिला माता यांनी मनापासून प्रयत्न केल्याने हा कार्यक्रम घेतल्यामुळे विद्यार्थ्यांन समोर सुंदर वातावरण कसे निर्माण करता येईल हीच भावना गुरूंनी मनात बाळगून हा कार्यक्रम यशस्वी ही झाला आम्ही सुराय गावाचे ज्येष्ठ, श्रेष्ठ,पालक वर्ग या नात्याने आम्ही आपले खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आम्हाला आमंत्रण देऊन तुम्ही कार्यक्रमाला सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ पालक वर्ग व महिला माता यांना जागृत करून बोलविले त्याबद्दल गुरुजींचे मनापासून खूप खूप आभार. *✍️✍️श्री पांडुरंग शिपी पत्रकार दोंडाईचा*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद