नगरदेवळा येथील उज्वल परंपरा असलेली ग्राम शिक्षण समिती संचालित इंग्लिश मीडियम स्कूल नगरदेवळा(पाचोरा)शाळेच्या प्रवेशोत्सव 2025-26 आणि नवगतांचे स्वागत उत्साहात संपन्न..!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
नगरदेवळा प्रतिनिधी:
सुस्वगतम् !! सुस्वगतम् !! सुस्वगतम् !!
शाळेच्या प्रवेशोत्सव 2025-26 आणि नवगतांचे स्वागत! नगरदेवळा येथील उज्वल परंपरा असलेली ग्राम शिक्षण समिती संचालित इंग्लिश मीडियम स्कूल नगरदेवळा ता. पाचोरा जि. जळगाव येथे दिनांक 16.06.2025 सोमवार रोजी सण 2025-26 च्या नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्या वेळी संस्थेचे प्राचार्य काटकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका मोनाली शिरूडे मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षिके आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. त्या वेळी महिला शिक्षकांनी आकर्षक रांगोळी काढून शाळेचा परिसर सजविला. नर्सरी, ज्युनियर, सीनियर च्या विद्यार्थ्यांनी आणि पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉइंटचा आनंद घेतला आणि विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि खाऊ वाटून स्वागत केले. या वेळी सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment