सुस्वागतम सुस्वागतम नवीन शैक्षणिक वर्ष सन 2025 /26 च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा प्रतिनिधी
आज दिनांक 16 /06/2025, वार सोमवार रोजी संस्थाअध्यक्ष सन्माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम यांच्या सूचनेनुसार आजपासून शाळा प्रारंभ व नवीन विद्यार्थी प्रवेशोत्सवाची सुरुवात होत असल्यामुळे,आमच्या सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छ . संभाजीनगर संचलित स्व .खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा जिल्हा धुळे येथे ,विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेचे फुलमाळा ,फुगे लावून आणि रांगोळी टाकून शाळेचे सुशोभन केले होते .शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे , त्यांच्या पालकांचे आणि नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे शाळेतील सर्व शिक्षक / शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी औक्षण करून आणि पुष्पगुच्छ देऊन,टाळ्या वाजवून स्वागत केले.पालकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयी माहिती घेतली .नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेबद्दल संस्थेबद्दल योग्य माहिती देऊन विद्यार्थ्यांनचे ऍडमिशन करून घेऊन नवीन विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शाळेत पाठवण्याची विनंती केली .तसेच शाळेतील विद्यार्थी कु . सिद्धेश चौधरी यांच्या पालकांनकडून श्री .नरेंद्र चौधरी सर आणि सौ पूजा चौधरी मॅडम यांच्याकडून शाळेचा प्रारंभ दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट आणि इतर दैनंदिन वापराचे साहित्य भेट म्हणून दिले .शाळेचे संस्था अध्यक्ष साहेब मुख्याध्यापिका मॅडम आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून चौधरी दांपत्याचे मनापासून आभार .तसेच आज पासून शाळेवर रुजू झालेले विशेष शिक्षक श्री भिकन मासाळ सर यांचे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थी आनंदात होते .
सन्माननीय संस्था अध्यक्ष श्री .शिवाजीराव साळुंके पाटील साहेब ,यांनी शाळेतील सर्व शिक्षक / शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांना नवीन शैक्षणिक वर्ष सन 2025 / 26 च्या प्रारंभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा.*
Comments
Post a Comment