आज पाचोरा शहरातील शिवनेरी नगर येथे सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. रविकिरण महाराज यांचे किर्तनाचे आयोजन,तरी भाविक-भक्तांना येण्याचे आवाहन...!



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)

पाचोरा येथील रहिवासी दादासाहेब श्री. अरुण मोतीराम पाटील व त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय सौ. सरुबाई अरुण पाटील यांनी नुकतीच काशी, चारधाम यात्रा करुन घरी परतले यानिमित्ताने जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आज दिनांक ०३ मे २०२५ शनिवारी रोजी रात्री ठिक आठ वाजता दोंडाईचा येथील सुप्रसिद्ध किर्तनकार हे. भ. प. रविकिरण महाराज यांचे जाहीर किर्तन होणार आहे.

या जाहिर किर्तचा लाभ घेण्यासाठी भाविक, भक्तांनी आज रात्री ठिक आठ वाजता भडगाव रस्त्यावरील शिवनेरी नगर, महादेव मंदिराजवळ कैलामाता मंदिराच्या पाठीमागे उपस्थित राहावे असे आवाहन श्री. निंबा मोतीराम पाटील, श्री. रंगराव मोतीराम पाटील, श्री. अरूण मोतीराम पाटील, प्रा. श्री. वाल्मिक अरूण पाटील, श्री. लक्ष्मण अरूण पाटील (जळगांव पोलीस) यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद