रमेश जाधव,तालुका कृषि अधिकारी पाचोरा, दिपक ठाकूर, तंत्र अधिकारी, जळगाव, यांसह जामनेर,भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेअंतर्गत पाचोरा कृषि विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी)दि. 8 मे 2025 रमेश जाधव पाचोरा तालुका कृषी अधिकारी,दिपक ठाकूर, तंत्र अधिकारी, जळगाव, यांसह जामनेर,भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेअंतर्गत पाचोरा कृषि विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.
मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेअंतर्गत पाचोरा कृषि विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल कौतुकास्पद कामगिरी केली आहे, त्यांच्या या कामाची दखल घेत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.हा सत्कार सोहळा सकाळी जिल्हा नियोजन समिती सभागृह जळगाव येथे संपन्न झाला.
जिल्हा विकास समन्वय आणि दिशा समितीच्या 2024-25 या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात एकूण 130 अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक योजनांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या शुभप्रसंगी जामनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक पालवे, स्थापत्य अभियंता वाकडे, DEO श्रीराम पाटील, RHE मयुर मोरे,पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
सन्मान करण्यात आलेल्या योजनेत रेल्वे सेवा, विमान सेवा, राष्ट्रीय महामार्ग, सिंचन प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन,आदिवासी ग्रामविकास योजना अशा केंद्र पुरस्कृत महत्त्वाच्या योजनांचा समावेश होता.
याप्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, मंत्री गुलाबराव पाटील,खासदार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, सी.ओ.मॅडम सह सर्व अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment