पाचोरा येथील वकिली व्यवसाय करीत असलेले ॲड. दिपक पाटील यांची भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली..!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील वकिली व्यवसाय करीत असलेले ॲड. दिपक पाटील यांची भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली असुन ॲड. दिपक पाटील हे मागील वीस वर्षापासून पाचोरा तालुका जळगाव जिल्हा तसेच इतरत्र वकिली व्यवसाय करीत आहे.भारत सरकारने नोटरी म्हणून नियुक्ती केल्याबद्दल ॲडव्होकेट पाटील यांच्यावर सर्व मित्र परिवार, नातेवाईक व वकील मंडळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ॲडव्होकेट दिपक पाटील यांची भारत सरकारच्या मार्फत नोटरी पदी नुकतीच नियुक्ती झाली.ॲडव्होकेट वीस वर्षपासून वकिली व्यवसाय पाचोरा येथे करत असून पाचोरा व आदी कोर्टामध्ये विविध प्रकारची न्यायालयीन प्रकरणे हाताळत आहेत. स्त्रियांविषयीच्या समस्या,कौटुंबिक हिंसाचार,जमीनविषयक वाद तसेच दिवाणी व फौजदारी,महसुली तसेच उच्च न्यायालयीन प्रकरणे यांसारख्या विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये असंख्य लोकांना त्यांनी आजपर्यंत न्याय मिळवून दिलेला आहे.
त्यांचा मनमोकळा स्वभाव तसेच दांडगा जनसंपर्क यामुळे त्यांचा सर्वदूर नावलौकिक आहे. गरीब, अन्यायग्रस्त घटक यांची कामे ते अगदी मोफत करतात!
अश्या व्यक्तिमत्वास सर्व मित्र परिवाराकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा. शुभेच्छुक समाजसेवक ज्ञानेश्वर अहिरे
Comments
Post a Comment