पाचोरा आगार व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभाराला आळा बसविण्याबाबत व बसफे-या पुर्वरत करण्याबाबत...विभाग नियंत्रक जळगाव महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळ, जळगाव यांना दिले निवेदन....!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(दि. ०५/०५/२०२५)प्रति,मा.श्री. भगवान शंकर जगनोर सो, विभाग नियंत्रक जळगाव महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळ, जळगाव

यांचे सेवेशी

विषय

: पाचोरा आगाराची ७.१५ वाजता सुटणारी, पाचोरा, कुन्हाड, लोहारा मोहाडी मार्गे जळगांव व जळगांव आगारातुन सांयकाळी ५.०० वाजता सुटणारी जळगांव, नेरी मोहाडी मार्गे लोहारा पाचोरा एस.टी. बस फेरी पुर्ववत सुरू करण्यांबाबत व पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश वंजी पाटील यांच्या मनमानी कारभाराला आळा बसविण्याबाबत.

अर्जदार :-

श्री. शांताराम उर्फ आण्णा दगडु बेलदार रा. लोहारा (तपेश्वर नगर) ता.पाचोरा जि. जळगांच मो.नं. ९२८४४५२२९७ (अध्यक्ष कुमावत बेलदार समाज सेवा संघ पाचोरा तथा माहीती अधिकार कार्यकर्ता तथा समाज सेवक)

संदर्भ

जा.क.रा.प./विनिज/वाह/चालन/२३/१००६ दि.१४/०८/२०२३.

महाशय,

सेवेमध्ये सविनय सादर नमस्कार,

मी. श्री. शांताराम उर्फ आण्णा दगडु बेलदार रा. लोहारा (तपेश्वर नगर) ता.पाचोरा जि. जळगांव मो.नं. ९२८४४५२२९७ अध्यक्ष कुमावत बेलदार समाज सेवा संघ पाचोरा तथा माहीती अधिकार कार्यकर्ता तथा समाज सेवक, विनंती पूर्वक अर्ज करतो की... २/- २

आमच्या लोहारा गावाची लोकसंख्या १५ ते २० हजार असुन, लोहारा ता.पाचोरा येथुन जळगांवला जाण्यासाठी विदयार्थ्यांना, विदयार्थिनींना, जेष्ठ नागरीकांना, प्रवाशांना सकाळी पाचोरा आगारातुन ७.१५ वाजता सुटणारी व लोहारा ता.पाचोरा येथे सकाळी ८.१५ ला पोहचणारी एस.टी. बस व परतिच्या प्रवासासाठी सांयकाळी जळगांव आगारातुन ५.०० वाजता सुटणारी जळगांव, लोहारा पाचोरा या मार्गावर बस सेवा सुमारे ८ दिवसांपासुन पाचोरा आगार प्रमुख प्रकाश वंजी पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे सदर बस सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. सध्या खांन्देश महोत्सव अक्षय तृतीया (आखाजी) सणानिमीत्त सासरवासीण महीला माहेराला जाण्यासाठी, सदर बस सेवा बंद केल्यामुळे या मार्गावर अवैध प्रवासी वाहतुन करणाऱ्या वाहन धारकांवर कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे या मार्गावर अवैध प्रवासी वाहतुक ही राजरोजपणे सुरू आहे. त्यामुळे एखादयावेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाजगी वाहनाने महीलांप्रवाशी यांना कोंबुन कोंबुन प्रवास करावा लागत असुन खाजगी वाहन चालकांची मनमानी व भाडे अव्वाच्या सव्वा घेत असल्याने व सर्व प्रवाश्यांवर एक प्रकारचा अन्याय होत असुन सदर बस सेवा सुरू करण्याबाबत पाचोरा रा.प. आगार व्यवस्थापक श्री. प्रकाश वंजी पाटील यांना दि.०३/०५/२०२५ रोजी समक्ष भेट घेतली असता सदर आगार व्यवस्थापक यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यात त्यांनी म्हटले की, एस.टी. बस संख्या कमी असल्या कारणाने व चार एस टी बस गाडया स्कॅप मध्ये दिलेल्या असल्याने तसेच सदर बसला प्रवासी संख्या कमी असल्या कारणाने सदर बस सेवा ही बंद करण्यात आलेली आहे. तरी मा. महोदयांना माइया प्रमुख मागण्या आहेत की, त्या खालील प्रमाणे

१. पाचोरा रा.प. आगारातुन सकळी ७.१५ वा. सुटणारी, पाचोरा, कुऱ्हाड, लोहारा, मोहाडी मार्गे जळगांव

२. व परतिच्या प्रवासासाठी, जळगांव रा.प. आगारातुन सायंकाळी ५.०० सुटणारी जळगांव, नेरी, मोहाडी मार्गे लोहारा पाचोरा एस.टी.बस. दोन्ही फेऱ्या सदर वेळेत तात्काळ सुरू करून पाचोरा आगार ....३/- व्यवस्थापक प्रकाश वंजी पाटील यांच्या मनमानी कारभाराला आळा वसवुन सदरच्या बस फेऱ्या पुर्ववत सुरू कराव्यात ही आग्रहाची व कळकळीची विनंती. आपण सदर अर्जाची दखल न घेतल्यास मला नाईलाजास्तव आंदोलनाचा प्रवित्रा घ्यावा लागेल. व भविष्यात होणाऱ्या परिणांमास पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश वंजी पाटील हेच सर्वस्वी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद