पाचोरा(जळगाव)शहरात उजळली "नरसिंह अवताराची" रहस्यमय लीला...!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी)श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिर, पाचोरा येथे रविवार, 11 मे 2025 रविवारी "नरसिंह जयंती" महोत्सव तसेच भगवद्गीता साप्ताहीक सत्संग मोठ्या  भक्तीमय वातावरणात आनंदात संपन्न करण्यात आला. संध्याकाळी 6:00 ते 8:.30 या ,समयी पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये "कथा", "किर्तन", "पुष्पअभिषेक" तसेच "महाप्रसाद" यांचा समावेश होता. कार्यक्रमाची श्रीगणेशा  ही देशासाठी बलिदान दिलेल्या देशरक्षकांना  श्रद्धांजली देऊन करण्यात आली. दीपप्रज्वलन आणि 
उपस्थितांनी शहिदांना आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे इस्कॉनचे प्रवक्ते श्रीमंत चैतन्य जीवन प्रभुजी यांचे हृदयस्पर्शी प्रवचन. त्यांनी भगवान नरसिंह देवाच्या अवतारामागील गूढ आणि भक्त प्रल्हादाच्या निश्चल श्रद्धेचे माहत्म प्रभावी भाषेत उलगडले. प्रभुजी म्हणाले, "भगवान नरसिंह हे केवळ क्रोधाचे नव्हे, तर भक्तवत्सल्यतेचे सर्वोच्च रूप आहेत. संकटसमयी  भक्ताच्या रक्षणासाठी प्रभू कोणतीही मर्यादा ओलांडतात." प्रल्हादाच्या  निःस्वार्थ भक्तीचा उदाहरण देत त्यांनी उपस्थितांना आत्मपरीक्षणाचा संदेश दिला. "आपणही प्रल्हादासारखे निडर आणि पूर्ण विश्वासाने प्रभूचे स्मरण करणारे होऊ शकतो का?

 असा सवाल त्यांनी उपस्थित भाविकांना विचारला. प्रभुजींच्या प्रवचनातुन 'हरे कृष्ण' नामस्मरणाचे सामर्थ्य पटवून देण्यात आले. "संकट कितीही मोठं असलं, तरी हरे कष्ण महामंत्र हेच खरे शरण आहे," असे ते म्हणाले. त्यांच्या कीर्तनाने सर्व मंदिर परिसर भक्तिरसामध्ये  भारावून गेला होता, अनेक भाविकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. यानंतर भारतभूमीस अधिकाधिक मजबूत व समन्द होण्यासाठी भगवान
श्री जगन्नाथांच्या चरणी 'रत्नाकर' अर्पण करण्यात आले. या राष्ट्रभक्तिपूर्ण क्षणांनी नवचैतन्याची वातावरणामध्ये लहर उमटवली. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. परिसरातील शेकडो भाविकांनी या दिव्य आयोजनाचा लाभ घेतला. यावेळी पद्मना प्रभुजी, रमेशजी मोर, संजय सिंघानिया, रामचरित्रदास प्रभुजी, मनोज प्रभुजी यांच्यासह अनेक मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद