१ मे महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त महावितरण दोंडाईचा विभागीय कार्यालय येथे वेस्ट मटेरियल पासून बनवलेल्या फुलकुंडीचे कामगाराकडून भेट..!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
1 मे 2025  रोजी महावितरण कार्यालय दोंडाईचा विभाग येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचे  संपन्न झाला. हा दिवस कामगार दिन देखील असल्यामुळे त्याचे औचित्य साधून वेस्टेज मटेरियल पासून बनविलेल्या फुलकुंड्या कामगाराकडून भेट म्हणून देण्यात आल्या.
       1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम   महावितरण दोंडाईचा विभाग येथे संपन्न झाल्यावर कामगारांच्या वतीने अनोखा असा कार्यक्रम झाला. महावितरणमध्ये कार्यरत असलेले कामगार श्री राकेश गिरासे वरिष्ठ तंत्रज्ञ दोंडाईचा शहर कक्ष १ यांनी आपले दैनंदिन कामकाज करून मिळेल त्या वेळात वेळ काढून आपल्या आवडत्या छंदातून वेस्टेज प्लास्टिक मटेरियल पासून फुलकुंडया बनविल्या.  1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून त्यांनी 10 कुंड्या भेट स्वरूपात विभागीय कार्यालयास  दिल्या.
      आपल्या कंपनीचे काहीतरी देणं लागतो असा मनात असा विचार करून श्री.राकेश गिरासे यांनी पाण्याच्या प्लास्टिकच्या जार पासून तयार केलेल्या कुंड्या रंग रंगोटी करून, झाडांना रोज पाणी द्या असा संदेश लिहून स्वतःवाढवलेली फुलांची रोपटे बहुजन विद्युत अधिकारी व कर्मचारी फोरम विभागीय टीम कडून भेट म्हणून कार्यालयास दिले.मागील तीन महिन्यापासून आपले वीजबिल वसुलीची कामे व इतर कामे करून मिळालेल्या वेळात त्यांनी हा छंद जोपासला. 
     कार्यकारी अभियंता श्री भाऊसाहेब पाटील व उपकार्यकरी अभियंता श्री विजयकुमार वसावे
 श्री राजानंद मोठघरे साहेब यांनी
भेट वस्तू दिल्याबद्दल श्री राकेश गिरासे यांचे आभार मानले.
       कार्यक्रमाला सहायक अभियंता श्री सचिन पावरा, श्री किरण पाटील प्रभारी उप व्यवस्थापक व बहुजन विद्युत अधिकारी व कर्मचारी फोरम संघटनेचे सर्व दोंडाईचा विभागीय पदाधिकारी सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते श्री नाना पाटील,गणेश भाऊ मराठे,सुरेंद्रसिंग गिरासे,विशाल पाटील,विजूभाऊ सैदाने,अकबर शहा फकीर,दिलीप बेहरे,महाजन नाना,फारुख खाटीक सचिन राजपूत,मनोज सोनवणे, ज्ञानेश्वर ठाकूर, अनिल माळी,पंकज धनगर,हर्षल कांगणे,किशोर बोरसे,प्रवीण माळी,मेहबूब शेख,जयेश बोरसे,सुनील खैरनार,राकेश पवार,समाधान गिरासे, विकी राजपुत,योगेश गिरासे,मानव राजपुत,योगेश पवार,अबीरदास पावरा,राजू तडवी,अर्जुन सोनवणे,जितू रावल,संदीप पावरा,सुनील गिते,राकेश गिरासे तसेच सर्व दोंडाईचा उपविभाग व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.      *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद