महाराष्ट्र राज्य शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार ॲड.शुभांगी विठ्ठल फासे यांना जाहीर....!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
शेंदुर्णी:-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 हा जामनेर तालुक्यातील अँड.शुभांगी विठ्ठल फासे यांना जाहीर झाला.अँड.शुभांगी ह्या गेल्या अनेक वर्षांपासून महिला सबलीकरण या विषयावर काम करीत आहेत.जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी तसेच बालकांसाठी गावोगाव जाऊन मोफत विधी सेवा प्रदान करून तसेच सहकाराच्या माध्यमातून ,स्वच्छतेच्या माध्यमातून ,व्याख्यानाच्या माध्यमातून त्या समाज प्रबोधन करण्यास त्या आग्रही असतात.गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये शासनाच्या मेरी माटी मेरा देश,पर्यावरणीय जागृती वातावरणीय बदल,बालविवाह निर्मूलन,महिला सक्षमीकरण,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,बेटी बचाव बेटी पढाव,अशा अनेक उपक्रमात जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या अँड.शुभांगी विठ्ठलराव फासे यांची जिल्हा युवा पुरस्कार करिता निवड करण्यात आली आहे. याआधी सुद्धा तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत यांच्या हस्ते स्वच्छ भारत मिशन आणि राज्यस्तरीय संसदेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल गौरव करण्यात आला होता.तसेच त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना अनेक संस्थांनी राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवर त्यांचा गौरव केलेला आहे.अँड.शुभांगी ह्या शेंदुर्णी येथील शेतकरी श्री.विठ्ठलराव फासे यांची मुलगी असून अँड.प्रसन्न फासे यांची लहान बहीण आहे.अँड.शुभांगी यांना युवा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे गावपातळीवर सामाजिक स्तरावर त्यांचे खूप कौतुक होत आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव यांच्या वतीने दि. १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार पालकमंत्री श्री.गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात देण्यात आला .यावेळी जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब,जिल्हा पोलिसअधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.मिनल करनवाल मॅडम,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक साहेब यासह आदी अधिकारी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment