पाचोरा नगरपरिषद संचलित म.गांधी सार्वजनीक वाचनालयाच्या ई-लायब्ररी कक्षाचे मा.आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उदघाटन.



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा नगरपरिषद संचलित म.गांधी सार्वजनीक वाचनालय हे नुकतेच नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य वास्तूमध्ये स्थलांतरीत केले आहे. वाचनालयाची भव्य वास्तूने शहराच्या सौदर्यात भर घातलेली आहे. त्यात शहरातील विद्यार्थ्यांना आणखी एक मोलाची भेट नगरपालिकेने दिलेली असून दिनांक 01 मे 2025 रोजी असलेल्या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मा.आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आधूनिक अशा ई-लायब्ररीचे उदघाटन /लोकार्पण करण्यात आले.    
  याचाच एक भाग म्हणून मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी अंतर्गत देशातील अग्रगण्य स्पर्धा परिक्षा करीता तयारी करुन घेणाऱ्या नामांकित संस्थांच्या वक्त्यांची लेक्चर उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक करतांना आमदार श्री.किशोर आप्पा पाटील यांनी सांगीतले की, मुख्याधिकारी हे नेहमीच नाविन्यपुर्ण उपक्रम राबवित असून त्यांनी ई-लायब्ररी सारखा उपक्रम नगरपालिकेच्या वाचनालयात आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठया शहरात न जाता गावात राहून नामांकित स्पर्धा परिक्षा केंद्रांची अभ्यासाची भाषणे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिल्याने त्यांची गैरसोय टळून गरीब विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे. 
सदरच्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष संजय गोहील, भाजपाचे मधुभाऊ काटे, तहसिलदार विजय बनसोडे, ना.तहसिलदार कुमावत, ना. तहसिलदार रणजीत पाटील, ना. तहसिलदार मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील, प्रविण ब्राम्हणे, बंडूभाऊ सोनार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, स्वच्छता निरीक्षक तुषार मधुकर नकवाल,  अभियंता भैय्यासाहेब पाटील, कार्य.अधिक्षक चैतन्य राऊत, संगणक अभियंता मंगेश माने, विद्युत अभियंता योगेश रेवेकर, प्रशासन विभागातील प्रसाद पटारे, शशिकांत भालेराव, पा.पु.अभियंता श्रुतीका धात्रक आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहा.ग्रंथपाल शाम ढवळे, गजानन पाटील यांनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन ललित सोनार तर आभार सहा.ग्रंथपाल शाम ढवळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद