वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार प्रविण ब्राम्हणे व शेतकरी पुत्र सर्वप्रचित हेमंत चव्हाण या दोन्ही शिवसैनिकांची शिवसेना जळगाव जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
13 मे 2025 रोजी ह शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षातील पाचोरा-भडगांव मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची अनेक पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. सर्वसामान्य जनतेतील कार्यकर्ते कृष्णापरी पंचक्रोशीतील स्थानिक रहिवासी असलेले शेतकरी पुत्र हेमंत ज्ञानदेव चव्हाण यांची शेतकरी सेनेच्या "उपजिल्हाध्यक्ष" पदी निवड करण्यात आली. तर पाचोरा शहरामध्ये वृत्तपत्र क्षेत्रातील त्यासह इलेक्ट्रॉनिक मीडियात कार्य करत समाजसेवेची आवड असलेले हुशार ,शांतस्वभावाचे पत्रकार प्रविण हरिषचंद्र ब्राम्हणे यांची भीमशक्ती शिवशक्ती "जिल्हाध्यक्ष" पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र जिल्हाप्रमुख मनोहर (रावसाहेब) पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे. सदर निवड झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वतीने पुढील वाटचालीस  भरभरून शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच सामाजिक, राजकीय, सामान्य नागरिकांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद