पाचोरा शहरातील सौ सावित्रीबाई परशुराम शिंदे प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ सुवर्णा जितेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस! त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा शहरातील सौ सावित्रीबाई परशुराम शिंदे प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ सुवर्णा जितेंद्र पाटील यांचा आज वाढदिवस!  त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🎂🎂🎂सौ.सुवर्णा पाटील या शिक्षिका आहेत त्यासोबतच त्या एक उत्कृष्ट रांगोळी कलाकार आहेत, तसेच सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक, सुलेखनकार, साहित्यिका व सुंदर हस्ताक्षर तज्ञ आहेत.त्या गेल्या दहा वर्षापासून विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थ्यांचे अक्षर सुंदर व्हावे यासाठीचे त्यांचे प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे कारण ज्यांचे अक्षर स्वतःला वाचता येत नसेल असे असेल तरीसुद्धा विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाने अतिशय सुंदर अक्षर काढण्यास प्रवृत्त होतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, गरिबातल्या गरीब मुलाला सुद्धा सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांनी स्वतः सुंदर हस्ताक्षरांचे पुस्तक लिहिले आहे. हस्त लेखन कौशल्यमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांना अक्षरलेखनाची गोडी लागते आणि विद्यार्थी शिक्षक प्रिय होतो या त्यांच्या कलेमुळे पाचोरा तालुक्यातील पंचक्रोशीत त्यांचे रांगोळी आणि हस्ताक्षर या क्षेत्रात नाव आहे. अष्टपैलू शिक्षिका म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवीला  आहे.त्यांच्या हातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर झालेले आहे. तसेच रांगोळी, अक्षरलेखन, सुलेखन,नृत्य, अभिनय,गायन,या कलांसोबतच त्या सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. नुकत्याच sun tv आयोजित सोहळा सख्यांचा या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याची छाप पाडली व बक्षीसही मिळवले. त्यांना कलाक्षेत्रात,शैक्षणिक क्षेत्रात अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत, त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत, सतत आनंदी राहूनसतत कार्य मग्ने राहणे हा त्यांचा स्वभाव आहे. विद्यार्थिनींसाठी आठवड्यातून एक दिवस रांगोळी क्लास, महिलांसाठी फ्री मध्ये दररोज संध्याकाळी झुंबा क्लास वर्षभर त्या घेतात.  स्वतः सोबतच इतरांच्या ही आरोग्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.विशेष म्हणजे घरातील सर्व जबाबदारी सांभाळून, त्या सर्व क्षेत्रात पुढे आहेत, त्यांच्या घरी त्यांचे सासरे 85 वर्षांचे आहेत त्यांचेही सर्व व्यवस्थित काळजी घेऊन त्या या सर्व कलागुणांची जोपासना करतात. या सर्व कार्यात त्यांचे सासरे  माजी सैनिक  श्री. गजानन पाटील (आप्पा )पती केंद्रप्रमुख श्री. जितेंद्र पाटील व त्यांच्या मुली अपूर्वा व आरोही यांचाही मोलाचा वाटा व पाठिंबा आहे. त्यांच्या या प्रयत्नांची दखल नक्कीच समाजातून घेतली जाते व त्यांचे वेळोवेळी कौतुक केले जाते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा लेख लिहिण्यात आला आहे त्यांचे हे कार्य असेच अखंडपणे चालू राहो, त्यांचे आरोग्य चांगले राहो,त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडोत आणि समाजसेवा निरंतर घडत राहो या त्यांना आमच्या कडून शुभेच्छा.💐💐🌹🌹🎂🎂

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद