दोंडाईचा जैन सोशल ग्रुप दोंडाईचा तर्फे पानपोई चे रावळनगर येथे उदघाट्न..!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दिनांक १२मे रोजी जैन सोशल ग्रुप दोंडाईचा संचलित व स्व. नेमिचंदजी कवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत जलसेवा सुरू करण्यात आली.या वर्षी तापमान खूप जास्त असल्याने गोरगरीब जनता, लहान बालक तसेच सर्व जेष्ठ नागरिकांसाठी फिल्टर पाण्याच्या जारची व्यवस्था करण्यांत आली. या पानपोईच्या उदघाटन दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल कवाड यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अरुणआप्पा चौधरी,शशांक भावसार उपस्थित होते.या पाणपोई चे प्रकल्प प्रमुख सुनील खिवंसरा आहेत.या उदघाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष रमेश पारख,जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष गणेश कोटेचा,सचिव दिनेश कर्णावट,जैन सकल संघाचे अध्यक्ष मनोज मालू,प्रदीप पारख,अभय कवाड,जितेंद्र छाजेड, जयदीप सेठ,डॉ किशोर कर्णावट,नरेंद्र भंडारी,नवनीत रुणवाल, सीए रितेश गोलेच्छा, सीए भिकम बोथरा, सचिन छाजेड,अल्पेश कर्णावट, अरुण ठाकुर,जयेश छाजेड, ओम छाजेड आदी उपस्थित होते.
अशा सहा पानपोई जैन सोशल ग्रुप व स्व.नेमिचंदजी कवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोंडाईच्यात सुरू आहेत *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा.*
Comments
Post a Comment