शेतकऱ्यांचे हित साधणारे एक सामान्य शेतकरी व जाणकार अभ्यासू व्यक्ती सुनील पाटील यांची शेतकरी सेना जिल्हाप्रमुख पदी निवड...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(शब्दांकन अनिल आबा येवले)
पाचोरा पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडी शेवाळे येथील रहिवासी असलेले प्रगतशील आदर्श शेतकरी असलेले श्री सुनील रंगराव पाटील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले व्यक्तिमत्व असून ते कला शाखेचे पदवीधार आहेत.सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या सुनील पाटील यांनी आघाडीच्या दैनिकात वृत्त लेखनाचे काम साहित्य लेखनाची आवड जोपासत निष्ठेने शेती व्यवसाय करत शेती या विषयावर खूप बराचअभ्यास केलेला आहे.त्यांनी नोकरी हा विषय न करता शेतीवर भर दिला व दरवर्षी भाजीपाला पिके तसेच कापूस पिकत चांगल्या प्रकारे उत्पन्न काढून ते आपला परिवार प्रामुख्याने शेती उत्पन्नावर चालवतात.शेतीसोबत त्यांनी एक दुय्यम व्यवसाय म्हणून एलआयसी प्रतिनिधी म्हणून कार्यतर आहेत.पाचोरा येथे वास्तव्यास असलेले सुनील पाटील यांनी तालुक्यातील राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात चांगले संबंध  ठेवले आहे. त्यांनी मध्यंतरी काळात पत्रकार क्षेत्रात देशोन्नतीचे तसेच या दैनिकात तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले तसेच दैनिक नवराष्ट्र नवभारत या पेपरचे तालुका प्रतिनिधी असून उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे वृत्तलेखन करतात.व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकरिता बातम्या टाकून त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद मार्फत शासनाच्या येणाऱ्या सर्व सुविधांचा ते त्यांना लाभ करून देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी घेऊन त्यांना शेतकरी शिवसेना जिल्हाप्रमुख पद दिले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.एक खरा शेतकरी ज्याला शेतकरी सेना जिल्हा प्रमुख पद दिले त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक अभिनंदन होत आहे.🌹

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद