खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते कलाकार, पत्रकार आबा सूर्यवंशी यांचा सत्कार..!



 (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम उद्यान कार्यक्रमात  
गौरवोद्गार आणि सत्कार!
पाचोरा येथील स्मशानभूमी शेजारील नगर परिषदेच्या ओपनस्पेस जागेत केंद्र सरकारच्या निधीतून सुमारे १ कोटी खर्चाचे भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यानाचे लोकार्पण आज दिनांक ४ मे रोजी खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते तर कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडले. या वेळी प्रास्ताविक मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांनी प्रास्ताविकात नगर परिषदेच्या वतीने शहरात आ. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून नियोजित विकास कामांची माहिती दिली. 
या कार्यक्रमात  भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यानाची अतिशय उत्कृष्ट आणि सुरेख, पेंटिंग करणारे पाचोरा पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध कलाकार, तथा पत्रकार लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांचा खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

लक्ष्मण आबा सूर्यवंशी हे पत्रकार आणि कलाकार असून या दोन्ही नाण्याच्या एकच बाजू असल्याचे सांगून  खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी आबा सूर्यवंशी यांच्या उद्यानातील केलेल्या पेंटिंग कामाचे भाषणात विशेष कौतुक केले.
या प्रसंगी नगररचना विभागाचे सहा. संचालक श्री.राजेश पाटील,सचिन पाटील, मुख्याधिकारी  श्री.मंगेश देवरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उप नगराध्यक्ष, शरद पाटे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे,   प्रवीण ब्राह्मणे,एम एसपी बिल्डकॉन चे युवा उद्योजक मनोज शांताराम पाटील आदी सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद