पाचोरा तालुक्यातील पंचक्रोशीत पहिल्यांदा बघायला मिळाले की आईवडीलांच्या गंगा पुजनासमयी मुलांनी केला पुस्तक तुला सोहळा संपन्न...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी) पाचोरा व भडगाव तालुक्यातील होतकरू गरीब बेरोजगार युवकांना स्पर्धा परीक्षेमध्ये यशप्राप्तीसाठी "सामान्य ज्ञानाची" पुस्तके योग्यवेळी उपलब्ध नसतात. याची जाणीव ठेवून आईवडिलांच्या गंगापूजनाच्या शुभमंगल वेळी त्यांच्या सुसंस्कारित दोन "रत्नमुलांनी" त्यांच्या वजनापेक्षा दहा किलो अधिक जास्तीचे पुस्तक तुला करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यामधील 8 वाचनालयांना ही पुस्तके दिली आहे.
माजी आमदार कै. आर.ओ.तात्या व विद्यमान हॅट्रीक कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांचे रहिवासी असलेले अंतुर्ली बु.प्र.पा.येथील शेतकरी अरुण मोतीराम पाटील व सरलाबाई अरुण पाटील हे चारधाम यात्रा करून सुखरूप घरी परतले. त्यांचे सुपुत्र पो.हे.कॉ. लक्ष्मण अरुण पाटील व प्राध्यापक वाल्मिक अरुण पाटील या सुसंस्कारित मुलांनी ह्या कार्यक्रमचे आयोजित केले. आमदार किशोर पाटील आपल्या भाषणात म्हणाले की माझ्या जीवनातील पहिला प्रसंग आहे की मुले ही आईवडिलांच्या गंगापूजनाच्या शुभमंगल वेळी गरीब होतकरू स्पर्धा परीक्षा इच्छुक युवकांसाठी सामान्य ज्ञानाचे पुस्तके तुला करत आहेत.
याप्रसंगी सुसंस्कारित जीवन कसे जगावे, या विषयावर प्रबोधनात्मक कीर्तन रविकिरण महाराज यांनी सादर केले. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमा ला सामाजिक , पोलिस प्रशासन राजकीय,तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन कौतुक केले. या कार्यक्रमाला आमदार श्री किशोर आप्पा पाटील माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ श्री मनोज शांताराम पाटील श्री रावसाहेब पाटील श्री विकास पाटील सर श्री राजेंद्र चिंचोले सर श्री संजय कुमावत श्री प्रमोद सोनार तसेच पाचोरा शहरातील अनेक मान्यवर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सी एन चौधरी सर व आभार श्री लक्ष्मण पाटील यांनी केले
Comments
Post a Comment