पावसाळापूर्व स्वच्छता मोहिमेला पाचोरा शहरात सुरुवात – आमदार किशोर पाटील यांच्या आदेशानुसार महत्त्वपूर्ण पाऊल...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा, दि. २१ मे – दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी पाचोरा शहरातील गटारी, नाले व भुयारी गटारांमधील गाळ काढण्याचे व चेंबर स्वच्छ करण्याचे काम पाचोरा नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यंदा अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात घेता, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. किशोर पाटील यांनी पाचोरा नगरपरिषदेला तातडीने स्वच्छता मोहिम सुरु करण्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार नगरपालिकेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी त्वरित कृती करत आरोग्य निरीक्षक तुषार नक्वाल यांना मोहिमेची जबाबदारी सोपवली. मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक आठ येथून करण्यात आली. यावेळी प्रभागातील जनसेवक व तालुका माझा न्यूज चे संपादक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला.

गटारी आणि भुयारी गटारांमध्ये वर्षभर साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची व रस्त्यांवर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरभर स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छता मोहिमेचे काम नगरपालिका कर्मचाऱ्यांद्वारे युद्धपातळीवर सुरू असून, प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे.

स्वच्छता कामावेळी आरोग्य विभागाचे मुकादम पांडुरंग कोळी आणि भिकन गायकवाड यांनी देखरेख केली. पाचोरा शहरातील सर्व प्रभागांमध्ये ही मोहिम नियोजनबद्ध रितीने राबवली जाणार असून, नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

शहरातील स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा सक्षम ठेवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे असून, येत्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद