दोंडाईचा बसस्थानका वर स्वतंत्र रिझर्व्हेशन टेबल वर कर्मचारी असावा अशी असंख्य प्रवासी वर्गाची मागणी...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
सद्या लग्न सराईचे सिजन सुरू असुन दोंडाईचा बस स्थानकावरून रोज जाणारे येणारे प्रवाशांची प्रचंड गर्दी असुन प्रवास करताना एस टी बस मध्ये प्रवाशांची गर्दी मुळे लांब पल्यांच्या पुणे कल्याण मुंबई व ईतर ठिकाणी जाताना आपली जागा सुरक्षीत असावी म्हणून रिझर्व्हेशन करून जात असतात परंतु संध्या रिझर्व्हेशन करणे जिकिरीचे झाले असुन पूर्वी रिझर्व्हेशन व शाळेतील मुलांना पास देण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी होता म्हणून मुलांना पास घेण्यासाठी व प्रवाशांना वेळेवर रिझर्व्हेशन मिळत असे परंतु कर्मचारी कमी असल्याने संध्या रिझर्व्हेशन टेबल कोणीच बसलेला नसतो परिणामी तेथील बस स्थानक कंट्रोल रूमला विचारले तर बंद आहे ऑनलाईन करुन ध्या असे उत्तर मिळत असते त्यामुळे रिझर्व्हेशन करण्यासाठी प्रवासी वर्गाची अत्यंत गैरसोय होत आहे तरी मा. दोंडाईचा बस स्थानक प्रमुख यांनी बसस्थानक वर रिझर्व्हेशन करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावा व प्रवाशांची होणारी गैरसमज कमी करावी अशी असंख्य प्रवासी वर्गाची मागणी आहे *✍️ ✍️श्री पांडुरंग शिपी पत्रकार दोंडाईचा*
Comments
Post a Comment