पाचोरा येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(शब्दांकन: जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले)
   आपल्या पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य दिव्य वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जवळजवळ 300 मुलं व मुली सहभागी झाले होते सदर शिबिर पूर्णपणे निशुल्क होते या शिबिराचा उद्देश म्हणजे अलीकडे मोबाईल कम्प्युटर सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीला संस्कारांकडे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.
    आजकाल पालक ही विद्यार्थ्यांकडे फार लक्ष देत नसतात व त्यांना पाहिजे तेवढा वेळ देत नसतात म्हणून मुले ही सोशल मीडियाच्या आहारी जात असतात त्यांना संस्कारांची कमी वाजते त्यामुळे त्यांना संस्कार मिळावे म्हणून पाचोरा शहरातील भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर व अनाथांची माय सौ सुनीता ताई पाटील पाचोरा या दोघांच्या माध्यमातून भव्य दिव्य आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व शिबिरात विद्यार्थ्यांना योगासन प्राणायाम जीवनमूल्य व्यक्तिमत्व विकास अभंग गायन रामरक्षा विष्णुसहस्रनाम हनुमान चालीसा ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा आदी करून विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले*
      सदर शिबिराला पाचोरा शहरातील अनेक दानशूर दात्यांनी विद्यार्थ्यांना भोजन नाष्टा तसेच शीतपेय उपलब्ध करून विद्यार्थी यांची सेवा केली तसेच शिबिराला शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री रमेश जी मोर साहेब यांचे सुद्धा विशेष अनमोल सहकार्य लाभले.
   सदर शिबिराचे उद्घाटन पाचोरा पोलीस स्टेशन येथील लोकप्रिय अधिकारी योगेश गणगे व भदाणे साहेब यांच्या हातून वाहून समारोप पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी पी आय अशोक पवार साहेब यांच्या हातून झाला*
    शेवटच्या दिवशी उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी पुरणपोळी च्या प्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
     सदर शिबिर निर्विघ्नपणे पार पडले सर्वदा त्यांच्या सहकार्यामुळे शिबिर निशुल्क घेता आले. त्याबद्दल योगेश जी महाराज व सुनिता ताई यांनी संपूर्ण नागरिकांचे आभार मानले सदर शिबिराच्या प्रसिद्धीसाठी सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा विशेष सहकार्य लाभले.🙏🏻💐

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद