आभाळमाया वृद्धाश्रम पुणे येथे मातृदिन हा पाचोर्यातील जेष्ठ पत्रकार लक्ष्मण आबा सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल देशमुख व इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा सौ. निर्मलाताई देशमुख यांची कन्या डॉ.अपर्णा देशमुख ह्या गेल्या १४ वर्षांपासून आभाळमाया वृद्धाश्रम चालवीत आहे. दिनांक ११ रविवारी वृद्धाश्रमात जागतिक मातृदिन साजरा करण्यात आला. आपले पाचोऱ्याचे आर्टिस्ट तथा पत्रकार लक्ष्मण आबा सूर्यवंशी हे पुणे येथे त्यांचे पेंटिंग कामाचे निमित्ताने गेले असता त्यांनी आभाळमाया वृद्धाश्रम येथे भेट दिली.
या प्रसंगी पाचोरा येथील पुणे नगरीत स्थायिक झालेले संगीतशिक्षक, सुरमणी डॉ. सुधाकर तळणीकर सर, पाचोरा येथील सुप्रसिद्ध नितीन सिनकर (आयडियल पत्रकार संघटनेचे पुणे अध्यक्ष) डॉ.अनिलराव देशमुख, सौ.निर्मलाताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
Comments
Post a Comment