आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम 2025 नियोजन व आढावा कार्यशाळा 06 मे मंगळवारी पाचोर्यात संपन्न होणार...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
महाराष्ट्र शासन, कृषी विभाग मार्फत दरवर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम पाचोरा तालुक्यात राबविण्यात येत असतात. त्याच दृष्टिकोनातून या वर्षात पाचोरा तालुका कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय खरीप नियोजन व आढावा बैठक तालुक्याचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील, (पाचोरा /भडगाव मतदार संघ) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 06 में 2025 रोजी सकाळी 09.30 वाजता पाचोरा येथे कृषी विभागाच्या आवारात फळरोप वाटिका, गिरड रोड येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तेथे कृषी विभागामार्फत सन 2024-2025 मध्ये राबविण्यात आलेले शेतकऱ्यांसाठीचे उपक्रम तसेच 2024-2025 मधील लक्ष साध्य याचा आढावा तसेच पुढील खरीप हंगाम 2025 मध्ये राबवयाचे उपक्रम याचा नियोजन आराखडा यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ही कार्यशाळा राबविण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये खरीप हंगाम 2025 करिता राबवयाच्या विविध मोहिमा व क्षेत्रीय प्रात्यक्षिके या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. तसेच या प्रात्यक्षिकांद्वारे सर्व माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना विनामुल्य देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये कृषी निविष्ठा उत्पादन कंपन्या व विक्रेते, सूक्ष्म सिंचन संच कंपन्या व विक्रेते यांचा देखील सहभाग यामध्ये राहणार आहे. तसेच शेतमाल प्रक्रिया उद्योजक निर्मिती करिता तालुक्यात PMFME योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले नवउद्योजक यांचा देखील सहभाग घेऊन त्यांच्या मुलाखती व स्टॉल येथे दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे उपस्थित राहणारे शेतकऱ्यांना नवउद्योजक होण्याची यातून प्रेरणा मिळेल व शेती क्षेत्रात त्याचा उपयोग होईल.
अशा या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे अध्यक्षस्थान मा. आ. किशोर आप्पा यांच्या दिशादर्शनाखाली सदर उपक्रमाचे कामकाज पार पडत आहे. या अनुषंगाने सविस्तर व सूक्ष्म नियोजन करणेकामी दिनांक 04 में 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी, पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व नियोजन बैठक पार पडली. सदर बैठकीला कृषी विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी वृंद तसेच कृषी अधिकारी, पंचायत समिती पाचोरा, खाजगी कृषी निविष्ठा कंपनी प्रतिनिधी व विक्रेते तसेच सूक्ष्म सिंचन कंपनी प्रतिनिधी व विक्रेते, फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments
Post a Comment