शिंदे विद्यालयाची 100% उज्वल यशाची परंपरा कायम...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा प्रतिनिधी - येथील गिरणाई शिक्षण संस्था संचालित- कै. पी के शिंदे माध्यमिक विद्यालयाचा एस एस सी परीक्षेचा निकाल अनेक वर्षापासून 100% लागत असून याही वर्षी विद्यालयाने ही परंपरा कायम ठेवली आहे.
विद्यालयातून परीक्षेसाठी 157 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी विशेष प्राविण्य मिळवलेले 116 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीमध्ये 32 विद्यार्थी , द्वितीय श्रेणीमध्ये 09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
विद्यालयातून 90% च्या वर 21 विद्यार्थी यशस्वी झाले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, युवानेते अमोलभाऊ शिंदे, उपाध्यक्ष नीरजभाऊ मुनोत, सचिव एड. जे डी काटकर, सहसचिव डॉ. प्रा. शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक जी व्ही सोमवंशी, पर्यवेक्षक व्ही पी देशमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी
1 सागर अनुष्का नितीन 96.40
2 नागणे हर्षाली ललित 94.60
3 पाटील हर्षाली गोरख 94.20
4 साळुंखे प्राची बाळासाहेब 93.60
5 कोठावदे सर्वेश सुभाष 93.40
Comments
Post a Comment