रोटरी इंग्लिश स्कूलचा 10 वी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा 100% निकाल....! सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत..!
दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलचा दहावी सीबीएसई (AISSE) बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण 37 विदयार्थ्यांपैकी 33 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, तर प्रथम श्रेणीत 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
स्कूलमध्ये कु. ओवी बिरारीस 97.4 टक्के गुण मिळवून प्रथम, पूर्वा जाधव हिने 96 टक्के गुण मिळवून द्वितीय, पूर्वा पटेल हिने 95.6 टक्के गुण मिळवून तृतीय, मोक्षदा पाटील हिने 95.4 टक्के गुण मिळवून चतुर्थ तर अश्विनी भावसार हिने 94 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला. याशिवाय जागृती रावल, वैष्णवी ठाकरे, ध्रुव महाजन, धनिषा राजपूत सागर शिरसाठ यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळविले.
एकूण 10 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण,13 विद्यार्थ्यांनी 8O% पेक्षा अधिक गुण,10 विद्यार्थ्यांनी 70% पेक्षा अधिक गुण, 4 विद्यार्थ्यांनी 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले.
शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवणाऱ्या गुणवत्ताधारक व उत्तीर्ण सर्व विदयार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह, उपाध्यक्ष श्री डॉ.मुकुंद सोहोनी, डॉ.राजेश टोणगांवकर, संचालक मंडळ,प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक, रोटरी परिवार, समन्वयक प्रशांत जाधव, पालकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा.*
Comments
Post a Comment