पाचो-यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. ललीताताई पाटील "SUN मराठी" या टीव्ही चॅनल मार्फत "हुकमाची राणी" या सिरीयल मध्ये लवकरच झळकणार..!
मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा)"SUN"या टीव्ही चॅनेल मार्फत हुकमाची राणी ही सिरीयल लवकर चालू होणार असून या सिरीयलच्या प्रमोशन साठी पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ता सौ ललिता ताई पाटील यांच्यावर काही भाग चित्रित करण्यात आलेला आहे. ताईंच्या कार्याची दखल सन मराठी ने घेतली त्याबद्दल ताईंनी त्यांचे मनापासून आभार मानले त्यांचे काम राजकीय असो सामाजिक असो अगदी निस्वार्थ भावनेने काम करतात कोणाकडूनही काही अपेक्षा ठेवत नाही. सर्व महिला भगिनी ताईंच्या शब्दाला मान देतात कारण ताई त्यांच्या हाकेला नेहमी धावून जातात.. आम्हालाही ताईंचा अभिमान आहे हुकमाची राणी ही मालिका लवकरच सनमाराठी या टीव्ही चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. तरी प्रत्येकाने आवश्य बघावी
Comments
Post a Comment