जळगाव जिल्हयासाठी शेतसुलभ योजनेची कार्यप्रणाली (SOP) "शेतकऱ्यांसाठी सुलभता, शेतीसाठी समृध्दी"!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि. 17 एप्रील 2024 चे अशासकीय पत्रान्वये महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 दिनांक 08 ऑगस्ट 2023 च्या अधिसुचनेनुसार जळगाव जिल्हयातील 7/12 च्या इतर हक्कातील "तुकडा" शेरे कमी करण्यासाठी शेतसुलभ योजना अंतर्गत कार्यप्रणाली तयार करण्यात आलेली आहे.

त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे हस्तांतरण, विक्री आणि इतर व्यवहार सुलभव्हावेत, तसेच शेतजमिनीचा उत्पादक वापर वाढावा यासाठी शेतसुलभ योजना राबविली जात आहे. ही योजना महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 वर आधारित आहे. दिनांक 08 ऑगस्ट 2023 च्या अधिसुचनेनुसार जळगाव जिल्ह्यासाठी जिरायत जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र 20 आर आणि बागायत जमिनीचे 10 आर निश्चित करण्यात आले आहे. यानुसार, प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे वगळता, 7/12 वरील "तुकडा" शेरे कमी करण्यासाठी ही सविस्तर कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी सर्व संबंधितांनी या योजनेस सहकार्य करावे.

ही योजना केवळ शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या 7/12 च्या इतर हक्कांतील "तुकडा" शेरे कमी करण्यासाठी आहे. व मा. न्यायालयात प्रलंबित किंवा मालकी वाद असलेल्या जमिनींसाठी ही प्रक्रिया लागू नाही. तसेच यापूर्वी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करुन झालेल्या व्यवहारांचे गटांवर या परिपत्रकान्वये कार्यवाही करण्यात येणार नाही.

7/12 वरील "तुकडा" शेरे कमी करून शेतजमिनीचा उत्पादक वापर वाढवणे व शेतकऱ्यांना जमीन हस्तांतरण, विक्री आणि इतर व्यवहारात येणारे अडथळे दूर करणेचे हेतुने जळगाव जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या तुकड्यांचे शेरे काढून टाकणे कामी खालील प्रमाणे नियोजन केले जाणार आहे.

संबंधीत गावाचे ग्राम महसुल अधिकारी हे गावातील सर्व 7/12 उतारे तपासुन तुकडा शेरा असलेल्या गटांची यादी करणार आहे. त्यानुसार संबंधीत गावाचे मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडुन प्राप्त प्रस्तावाची सखोल तपासणी करणार असुन, सदर तपासणी नंतर तहसिलदार हे पात्र जमिनींसाठी "तुकडा" शेरे कमी करण्याचा आदेश पारीत करणार आहे.

यासाठी खालील प्रमाणे कालब्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.

कालमर्यादा :-

अ.क्र. दप्पा

1

2

3

तुकडा गटांची माहिती यादी तयार करणे

प्रस्ताव तपासणी आणि आदेश

फेरफार प्रक्रिया आणि अद्यावतीकरण 7/12

शिबिरांचे आयोजन आणि 7/12 वितरण

कालावधी

21 एप्रिल 2025-25 एप्रिल 2025

28 एप्रिल 2025-9 में 2025

12 में 2025 - 23 में 2025

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर अभियानांतर्गत आयोजीत शिबीरांमध्ये आयोजन व वितरण

जबाबदार अधिकारी

मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी

मंडळ अधिकारी, तहसिलदार

ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसिलदार

तहसिलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी

अहवाल सादर करणे

06 जून 2025

351 वा शिवराज्याभिषेक दिन

मंडळ अधिकारी, तहसिलदार, उपजिल्हाधिकारी

स्वाक्षरीत/---(विजय बनसोडे) तहसिलदार पाचोरा

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद