पाचोरा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन सोमवंशी



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा (प्रतिनिधी) - मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न असलेल्या जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका अध्यक्षस्थानी सचिन सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे




महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमी लढणारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संलग्न असलेल्या जळगाव जिल्हा पत्रकार संघ असुन या पत्रकार संघाच्या प्रत्येक तालुक्यात विस्तार झाला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सर्वात जुनी पत्रकार संघटना आहे. या पत्रकार संघाच्या पाचोरा तालुका अध्यक्षस्थानी सचिन सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी श्री. सोमवंशी नेहमी लढत असतात यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा पत्रकार संघांच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती. गेल्या ३० वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात श्री. सोमवंशी यांचे नाव घेतले जात आहे. पत्रकारीता करतांना कोणतेही तडजोड कधीही केली नाही.जे पत्रकार पाचोरा तालुका पत्रकार संघाचे सदस्य होतील त्यांचा सन्मान जपणे त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे माझे कर्तव्य आहे असे सचिन सोमवंशी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद