घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो म्हणुन मुलास जिवे ठार मारलेल्या आरोपीतांचा एका तासाच्या आत भडगाव पोलिस प्रशासनाने अपघाताचा बनाव केला उघड...
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(भडगाव प्रतिनिधी )दिनांक ०८/०४/२०२५ रोजी २९.४५ वाजेच्या सुमारास बाळद खु. ता. भडगांव जि. जळगांव गांवी मयत नामे बाळु राजेंद्र शिंदे (नाईक), वय २६ वर्ष, रा. बाळद खुर्द, ता. भडगाव जि. जळगाव हा मयत झाले असले बाबत पोलीस पाटील बाळद खु. ता. भडगाव यांना समजुन आल्याने त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना सदर घटनेबाबत कळवुन लागलीच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे सदर घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाची व प्रेताची बारकाईने पाहणी करता मयताचे चेहऱ्यावर व छातीवर मारहाण झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन आले. त्यानंतर सदर प्रेत हे पुढील कारवाई साठी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे पाठविण्यात आले.
सदर घटनास्थळाचे व मयत याचे प्रेताची बारकाईने पाहणी करता पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार यांना घातपात झाल्याचा संशय आल्याने मा. पोलीस अधिक्षक माहेन्बर रेड्डी सो, जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक सी कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेशसिंह चंदेल सो, चाळीसगांव भाग यांचे सुचना व मार्गदर्शना नुसार सदर मयता बावत तपास करीत असतांना मयत प्रथम मयताचे नातेवाईकांनी अपघाताच्या बनाव केला. मयताचे वडील राजेंद्र रामचंद्र शिंदे व मपताचा भाऊ भारत राजेंद्र शिंदे अशांना पुढील चौकशीकामी पोलीस स्टेशनला बोलबाने, मयताचे वडील राजेंद्र शिंदे व त्याचा भाऊ भारत शिंदे यांनी मयत हा घरावरुन खाली पडल्याने मरण पावला असे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, मयत वाळू राजेंद्र शिंदे हा नेहमी घराच्या वाटणीत जास्त हिस्सा आमच्या कडे मागत असे व आमच्या सोबत वाद घालत असे त्यामुळे आम्ही दिनांक ०८/०४/२०२५ रोजी रात्री ०९.४५ वा. सुमारास घरात वाटणीचा जास्त हिस्सा मागतो या कारणावरुन त्यास आमचे घराजवळच धक्काबुक्की करुन लाथायुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करुन हातात लाकडी दांडके घेवुन मयत बाल राजेंद्र शिवे (नाईक) यास चेह-यावर व छातीवर मारहाण करन त्यास जिवे ठार मारले आहे आहे असे सांगीतल्याने याबाबत मयताचे कोणीही नातेवाईक तक्रार देण्यासाठी तयार नसल्याने बाळद खु. ता. भडगाव गावाचे पोलीस पाटील सुनिल लोटन पाटील वय ५४ धंदा-शेती व पोलीस पाटील, रा. बाळद खुर्द ता.भहगांव यांची फिर्याद घेवून भडगाव पो.स्टे. १२३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) ११५ (२), ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपी नामे १) भारत राजेंद्र शिंदे, वय २२ वर्ष, २) राजेंद्र रामचंद्र शिंदे, वय ४८ वर्ष, दोन्ही रा. बाळद खु ता. भडगाव जि. जळगांव अशांना दिनांक ०१/०४/२०२५ रोजी ०५.२० वाजता अटक करण्यात आली असुन मा. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी मजकूर यांचा अपघाताचा बनाव उघड करुन एका तासात आरोपी निष्पन्न करण्यात आले.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी सो, जळगाव, मा. अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगाव परिमंडळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेशसिंह चंदेल मो, चाळीसगांव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री गणेश म्हस्के, पो.उपनिरी, सुशील सोनवणे, पोहेको १५२३ मुकुंद परदेशी, पोहेको २०१६ नरेंद्र विसपुते, पोहेको २८८० निलेश ब्राम्हणकार, पोना ३०२७ मनोज माळी, पोको ११८५ महेद्र चव्हाण, पोको १७६९ दत्ता पाटील, पोको १५३७ संदिप सोनवणे, पोकों/१६७६ सुनिल राजपुत, पोकी/१९३२ प्रविण परदेशी, पोको ३८५ संभाजी पाटील (चालक) यांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री गणेश म्हस्के करीत आहेत.
Comments
Post a Comment