दोंडाईचा येथील पुष्पा देवी महिला कौशल्य प्रशिक्षण केन्द्राचा अभिनव उपक्रम
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल,)
दोंडाईचा येथील पुष्पा देवी महिला कौशल्य प्रशिक्षण केंद्र मार्फत शहर परिसरातील गरजू महिलांना शिलाई मशीन व ब्युटी पार्लर चे मोफत प्रशिक्षण देण्यात आले , मागील नऊ महिन्यात तीन सत्रात भरपूर महिला भगिनींना तज्ञ महिलांकडून सदर प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षित महिला भगिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी बनवलेल्या कापडी ड्रेस मटेरियल चे प्रदर्शन मान्यवरांचे उपस्थित नुकतेच भरवण्यात आले, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा खडसे, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकला सिसोदिया, माजी आरोग्य सभापती मनीषा गिरासे , प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक के एम काका अग्रवाल, जितो च्या अध्यक्षा सुगंधा जैन, सचिव हर्षा कांकरिया, अग्रवाल समाजाच्या महिला अध्यक्षा लिलाबाई अग्रवाल, सोनिया अग्रवाल, सुनिता अग्रवाल, सौ शकुंतला बागल, डॉ अवनी पाटील , रोहिणी लिंभारे , मंजुदेवी कवाड ,मनीषा जाधव, प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक लता कोठावदे, शिलाई मशीन तज्ञ अंजली शर्मा, भूमी शर्मा, ब्युटी पार्लर तज्ञ अंजना सोनवणे, सह शहरातील पत्रकार आर. डी. चौधरी, रविंद्र टाटीया सर, दौलत सूर्यवंशी, महेंद्र जैन, जितेंद्र गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रशिक्षित महिला भगिनींनी आपला अनुभव व्यक्त करत आपल्या हाताला रोजगार मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात पूजा खडसे यांनी महिला भगिनींना स्वयंरोजगारासाठी मिळणाऱ्या शासन स्तरावरील आर्थिक मदत बाबत आपले मनोगत व्यक्त केले. भाजपा महिला आघाडीच्या चंद्रकला सिसोदिया यांनी महिला भगिनींनी न घाबरता ब्युटी पार्लर प्रशिक्षण घेत स्वयंरोजगार निर्माण करावा. जितो क्लबच्या अध्यक्षा सुगंधा जैन ,सौ शकुंतला बागल, पत्रकार आर डी चौधरी, जितेंद्र गिरासे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र गिरासे सर यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुष्पादेवी महिला कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी मोठ्या संख्येने प्रशिक्षित महिला भगिनी उपस्थित होत्या *✍️✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा.*
Comments
Post a Comment