शुभंकरोति साहित्य परिवाराचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात 'पुस्तकरत्न ' पुरस्कार प्रदान...
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
साहित्य यज्ञ हेच ध्येय असलेल्या शुभंकरोति साहित्य परिवाराचे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पुणे येथे पार पडले. शुभंकरोतिच्या संस्थापिका सोनाली जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी भूषविले. प्रसिद्ध गझलकारा/समाजसेविका मा. ममताताई सिंधुताई सपकाळ यांची उपस्थिती संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले.संमेलनाचे उदघाटन उद्योजक व साहित्यिक राजीव श्रीखंडे यांच्या हस्ते झाले. तसेच संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यसंपदा संस्थापक,कवी वैभव धनावडे - पेण आणि दीपक पाटील (निबंधक, पालघर) लाभले .संत साहित्यिक/ प्राध्यापक रामकृष्ण दादा पाटील- पुणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर निशिकांत श्रोत्री-पुणे, डॉक्टर मधुसूदन घाणेकर- पुणे यांची सुद्धा उपस्थिती लाभली . शुभंकरोति साहित्य परिवारच्या संस्थापिका सौ. सोनाली जगताप आणि मुंबई, मुख्य प्रशासिका व समाजसेविका माननीय डॉक्टर माया दिलीप यावलकर, वरुड इत्यादी मान्यवरही उपस्थित होते . शिल्पा चऱ्हाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्वागताध्यक्ष म्हणून किरण वेताळ यांनी काम पहिले.
सदर संमेलनाचे वैशिष्ठ्य म्हणजे मराठी भाषेतील काही निवडक पुस्तकांचा सन्मान सुद्धा सदर संमेलनात 'पुस्तक रत्न ' पुरस्कार देऊन करण्यात आला.
काव्यसंग्रह सदरात 'वनमाला' -कवयित्री अर्चना गोरे ',मन मानसी' -मानसी नेवगी ,'अविका' -अरुणा नानोटी ,'शुभंकरोति' -प्रा. सुमती पवार,
'वागीश्वरी' -ऋजुता महिंद्रे ,'शब्द माझे तुझ्याचसाठी' -अश्विनी बोलके ,'मनपर्ण' -रंजना महेंद्र बोरा ,चित्रकाव्य संग्रह सदरात 'मिलाफ' -प्रांजली मोहिते ,कथासंग्रह सदरात
'अभिनव कथा' -डॉ.सुवर्णा पाटील अभिनव कथा ह्या काही वास्तवावर तर काही जीवन मूल्य शिकविणाऱ्या उत्कृष्ट अशा कथांचा संग्रह आहे. मुलांनी मोठ्यांनी सर्वांनी वाचावा असा कथासंग्रह 'अभिनव कथा 'आणि वैचारिक विभागात सुनील चिटणीस यांच्या 'वाचकांच्या भेटीला' या लेख संग्रहास पुरस्कार जेष्ठ गझलकार ए के शेख आणि गझलकारा/समाजसेविका मताताई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कारांच्या माध्यमातून लेखकांना प्रोत्साहन मिळून लिह्त्या हातांना बळ मिळेल आणि अधिकाधिक दर्जेदार साहित्य वाचकांना मिळेल असा आशावाद उपस्थितांनी दर्शविला.
Comments
Post a Comment