लोहारा येथे मा.ना.गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
लोहारा ता. पाचोरा दि.६
येथिल पाचोरा रस्त्यावरील ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर २७ मध्ये दहा गुंठ्यांत मा. नामदार गिरीष महाजन यांच्या प्रयत्नाने सुसज्य असे सामाजिक सभागृह बांधण्यात येत आहे. 
येथील प्रथमेश मराठा समाज मंडळाला अखेर यश प्राप्त झाले, यावेळी मंडळाचे काही  सक्रिय, संचालक ,सदस्य, यांनीही भरपूर त्रास सहन करीत लढा दिला , विद्यमान ग्रामपंचायत सत्ताधारी यांनी अनेक वेळा ठराव न देता हम करे सो कायदा, ची लेखणी चा अवलंब केला असे तज्ञ संचालकांनी आज पावतो घडलेल्या घडामोडींचे कथन उद्घाटन प्रसंगी बोलून दाखवले यावेळी ,अध्यक्ष नंदू सुर्वे, खजिनदार दत्तात्रय भोसांडे, रमेश शेळके, चंद्रकांत पाटील यांनी  लोहारा येथील माजी सरपंच मालतीबाई पाटील व उपसरपंच कैलास चौधरी यांच्याकडे सामाजिक सभागृहा साठी जागेची रीतसर मागणी केली व याचा पाठपुरावा माननीय नामदार गिरीश महाजन यांच्याकडे केला.
महाजन यांनी प्रशासकीय मान्यता मिळवून दिली व
याच जागेवर श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर समाज बांधवांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. 
या वेळी मा.ना.गिरीष भाऊ महाजन , भाजपा गट पालक सुहास पाटील, कैलास चौधरी, मालतीबाई पाटील व तत्कालीन ग्रामपंचायत सद्स्य यांचे आभार समाज बांधवांनी मानले. 
या प्रसंगी प्रथमेश मराठा समाजाचे अध्यक्ष प्रतापराव सुर्वे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय चौधरी, खजिनदार दत्तात्रय भुसांडे, सदस्य विनोद पाटील, जगन्नाथ हिरे, नरेंद्र पाटील, दीपक भोसंडे, गणेश बाविस्कर, श्रीराम शिंदे, कौतिक भोसांडे,पत्रकार महेंद्र शेळके,पत्रकार चंद्रकांत पाटील, पत्रकार कृष्णराव शेळके,
म्हसासचे माजी सरपंच किसन पाटील, नाना पवार, पुरुषोत्तम सुर्वे सर, सुनील शेळके, पोलीस पाटील सुरेंद्र शेळके, सुभाष बाविस्कर, रामधन शिंदे, संतोष पाटील, दीपक गोंधळे, बबलू डांबरे, श्रावण डांबरे, भरत पाटील, राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड राजू गोंधळे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन डांबरे व गावातील मराठा समाजाचे सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद