ॲड.रेखा सुर्यवंशी यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड...राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कु.संध्या उध्दव सोनवणे यांनी नुकतेच दिले नियुक्तीचे पत्र....


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
तळागाळातील-गोर-गरिब महिलांचे हक्क व जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करू-युवती महिला जिल्हाध्यक्षा ॲड. रेखा सुर्यवंशी....

दोंडाईचा-  धुळे सत्र न्यायालय व दोंडाईचा न्यायालयात वकीली व्यवसाय करणाऱ्या ॲड.रेखा लक्ष्मण सुर्यवंशी यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष कु.संध्या उध्दव सोनवणे यांनी नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेल्या ॲड.रेखा सुर्यवंशी यांनी सांगितले की,न्यायालयीन कामकाज करत असतांना मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष काळात पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात  वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा संपर्क संघटन वाढवले असुन, यापुढेही आपले कार्य निरंतर चालू ठेवत. समाजातील-तळागाळातील-गोर-गरिब महिलांचे संपर्क-संघटन वाढवत,त्यांचे हक्क बाबत जागरुकता निर्माण करत,त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न चालू ठेवणार असे शेवटी प्रतिक्रिया देताना सांगितले.तरी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस जनमत-मिडीया ग्रुपकडून कोटी कोटी शुभेच्छा *✍️✍️ श्री पांडुरंग पत्रकार दोंडाईचा.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद