दोंडाईचा सकल जैन समाजा तर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस उत्साहात साजरा,,सलग दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा येथील सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात समाजातील लहान मोठ्या सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.
बुधवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी विश्व नवकार मंत्र दिवस निमित्त जैन स्थानक येथे सामुहिक जाप चे आयोजन करन्यात आले होते त्यात जैन धर्मीयांसोबतच अजैनांची ही लक्षणीय उपस्थिती होती. त्यानंतर महिलांनी ऐतिहासिक मोटरसाइकल रॅली द्वारे शहरातील मुख्य मार्गावरून भगवान महावीरांचा जयघोष करत अहिंसेचा संदेश दिला. या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले.
त्यागी दिवशी रात्री हस्ती स्कूल येथे झालेल्या क्लिनिकल हिप्नोथेरेपी च्या कार्यशाळेत साची जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुवार सकाळी सामुहिक सामायिकचे आयोजन करन्यात आले होते तदनंतर शहराच्या मुख्य मार्गावरून शोभायात्रा काढन्यात आली. नंतर जैन स्थानक येथे धर्मगुरूंचे प्रवचन संपन्न झाले. दुपारी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक महिलांनी आपल्या नाटीकेद्वारे विविध मूल्यांचा संदेश दिला.*दोंडाईचा सकल जैन समाजा तर्फे भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस उत्साहात साजरा*
*सलग दोन दिवस कार्यक्रमाचे आयोजन*
दोंडाईचा येथील सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात समाजातील लहान मोठ्या सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.
बुधवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी विश्व नवकार मंत्र दिवस निमित्त जैन स्थानक येथे सामुहिक जाप चे आयोजन करन्यात आले होते त्यात जैन धर्मीयांसोबतच अजैनांची ही लक्षणीय उपस्थिती होती. त्यानंतर महिलांनी ऐतिहासिक मोटरसाइकल रॅली द्वारे शहरातील मुख्य मार्गावरून भगवान महावीरांचा जयघोष करत अहिंसेचा संदेश दिला. या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले.
त्यागी दिवशी रात्री हस्ती स्कूल येथे झालेल्या क्लिनिकल हिप्नोथेरेपी च्या कार्यशाळेत साची जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुवार सकाळी सामुहिक सामायिकचे आयोजन करन्यात आले होते तदनंतर शहराच्या मुख्य मार्गावरून शोभायात्रा काढन्यात आली. नंतर जैन स्थानक येथे धर्मगुरूंचे प्रवचन संपन्न झाले. दुपारी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक महिलांनी आपल्या नाटीकेद्वारे विविध मूल्यांचा संदेश दिला.तसेच धार्मिक पाठशाला संचालन करणार्या शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. रात्री आयोजित केलेल्या कार्यशाळेत एस्ट्रो न्युमेरोलोजिस्ट पिंकी मेहता मॅडमांनी अंकशास्त्र आणि वास्तुशास्त्रा बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
महावीर जयंतीच्या पार्श्वभूमी वर रविंद्र कोटडिया यांनी सलग एक आठवडा धार्मिक प्रश्नांवर आधारित व्हाट्सऍप प्रतियोगिता घेतली. यातील रोज सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्यांमधून लकी ड्रॉ द्वारा भाग्यवान विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकल जैन समाजाचे अध्यक्ष मनोज मालू, उपाध्यक्ष रतनलाल कोठारी, प्रदीप मुणोत, सचिव दिनेश कर्नावट, महेंद्र चोपडा,गणेश कोटेचा, नेमीचंद सोलंकी, रविंद्र टाटीया, संजय दुगड,हरीश झाबक,धनराज श्रीश्रीमाळ,भावेश कर्नावट, विकास छाजेड यांनी परिश्रम घेतले.समाजातील ज्येष्ठ व्यक्तिना घरपोच डब्याची व्यवस्था हरीश झाबक,चेतन सोलंकी,मयूर पारख,शैलेश बोथरा,ॲड.मितेश टाटीया, महावीर श्रीश्रीमाळ यांनी पार पाडली.युवकांतर्फे निखिल कर्नावट, निखिल कोटडिया, सुयश लोढा, नयन बाफना, नीरज मालू, पियुष खिवसरा, समकीत कर्नावट, प्रफुल्ल पारख यांनी आपले योगदान दिले. सदर कार्यक्रमा साठी दादावाड़ी ट्रस्ट, जीतो लेडीज विंग, हस्ती पब्लिक स्कूल,दोंडाईचा पोलिस स्टेशन, जैन सोशल ग्रुप, जैन सोशल युवा ग्रुप चे विशेष सहकार्य लाभले. ✍️✍️ *श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा.*
Comments
Post a Comment